Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

वेळापूर येथील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चालू असलेल्या "साखळी उपोषणास" माळशिरस तालुका सकल मराठा समाज मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग

 


उपसंपादक----नुरजहाँ शेख.

टाइम्स 45 न्युज मराठी.

                सकल मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून 50% च्या आत आरक्षण मिळावे यासाठी व श्री मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ वेळापूर येथे साखळी उपोषण चालू आहे. 

  आज शनिवार दिनांक 2 डिसेंबर रोजी वेळापूर येथे माळशिरस तालुका सकल मराठा महिला मंडळ यांच्यावतीने सक्रिय साखळी उपोषण संपन्न झाले. 




प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ सौ . हिराबाई मोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा सौ आक्काताई माने, कार्याध्यकक्षा सौ. वनिताताई कोरटकर, जिल्हा कार्याध्यक्षा प्रा. सौ. मीनाक्षी जगदाळे मॅडम, सौ शारदा चव्हाण, सौ अरुंधती हजारे मॅडम, सर्व सौ. सुवर्णा शेंडगे, .विजया शिंदे बालिका गोवे, सुषमा पाटील, पुनम पवार, छाया घाडगे, शोभा मुंडफणे,अनिता खटके मीनल मुंडफणे ,नलिनी जाधव , उज्वला रणनवरे , रंजना शिरसट, बीबी नवगिरे , साधना बागल व इतर अनेक मराठा महिला भगिनींच्या हस्ते पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्टेजवरून आरक्षण मिळण्याविषयी मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या. आरक्षण या विषयावर प्रा. सौ मीनाक्षी जगदाळे यांनी आपले विचार व्यक्त करताना आरक्षण कसे महत्त्वाचे आहे आणि आरक्षण न मिळाल्यास आम्ही पुढे जरांगे पाटील ज्या प्रमाणे म्हणतील त्याप्रमाणे पुढील पाऊल उचलणार आहोत , तसेच शिक्षण व नोकरीतील महत्त्व व्यक्त केले. आरक्षण ही मराठा समाजासाठी काळाची गरज असून आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत असे ठामपणे सांगितले. सौ अरुंधती हजारे मॅडम यांनी आरक्षण कसे महत्त्वाचे आहे व त्यासाठी आपण काय केले पाहिजे याबद्दल विचार व्यक्त केले. त्याचबरोबर सौ. नलिनी जाधव मॅडम यांनी शिक्षणात आरक्षण कसे महत्वाचे आहे आणि त्यांच्या मुलाला आरक्षणामुळे एमबीबीएस साठी अगदी एका मार्काने प्रवेश कसा मिळाला नाही याबद्दलचे दुःख व्यक्त करताना आरक्षणासंबंधी विचार व्यक्त केले. त्या मनोगत व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते. यावेळी स्टेजवर मराठा समाजाच्या महिला भगिनी यांनी गर्दी केली होती. आपण साखळी उपोषणाच्या माध्यमातून आरक्षणाच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला याबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. आरक्षण मिळावे यासाठी सर्वांची तळमळ व धडपड दिसून आली. शासनाने या सर्व महिला मंडळीचा आदर करून त्वरित आरक्षणाविषयी पावले उचलावेत अन्यथा याचे गंभीर परिणाम शासनास भोगावे लागतील हे मात्र नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा