Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

बावडा गावामध्ये अक्षता कलशाची मिरवणूक ; हजारो ग्रामस्थांचा सहभाग

 



इंदापूर तालुका..... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

             अयोध्येतून श्री रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आणण्यात आलेल्या अक्षता कलश बावडा ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.19 भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कलशाची गावातून वाजत गाजत व जय श्रीराम जय घोषणा देत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये महिलांची संख्या लक्षणिय होती. तसेच हजारो ग्रामस्थांचा सहभाग घेतला.



           जय श्रीराम च्या घोषणा देत कलशाची भव्य मिरवणूक श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात आणण्यात आली. मंदिरामध्ये ग्रामस्थांनी अक्षता कलशाचे दर्शन घेतले. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, माजी सरपंच किरणकाका पाटील, सरपंच पल्लवी गिरमे, विकास पाटील आदींच्या हस्ते आरती करण्यात आली. अयोध्या न्यास समितीचे जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मासाळ, संदीप सुतार, मयूरसिंह पाटील यांनी अयोध्येमध्ये दि.22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची माहिती दिली. तसेच बावडा गावात दि.22 जानेवारी रोजी हनुमान मंदिरामध्ये होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांची माहिती उदयसिंह पाटील यांनी दिली. दरम्यान, अक्षदा कलशाच्या काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीमुळे गावातील वातावरण धार्मिक बनले होते. या मिरवणुकीत गावातील भजनी मंडळे, श्री शिवाजी विद्यालयाची विद्यार्थी दिंडी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. बुधवार दि. 20 रोजीही कलश विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

 _________________

फोटो:- बावडा येथे अक्षदा कलशाची ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा