*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
अजितदादा पवार यांनी परवा मोठ्या अर्थात पवार साहेब यांच्यावर,तोंडसुख घेत "पवार साहेबांनी 38 व्या वर्षी बंड केले,तर मी 60 व्या वर्षी योग्य निर्णय घेतला"अस विधान केलं.*
एका अर्थाने अजित पवार यांना,पवार साहेब यांनी "गद्दारी केली" अस म्हणायचं होत.
पण 60 वर्षाचे होऊन देखील पवार साहेबांच्या छत्र छायेत वाढलेल्या अजित दादांना हे सरळ सरळ बोलायची हिम्मत झाली नाही.यातच मोठ्या साहेबांच्या बाबत असणारी त्यांची भीती स्पष्टपणे जाणवते.
आज आपली भूमिका कशी बरोबर आहे,हे सांगण्यासाठी अजित पवारांना मोठ्या साहेबांचं बंड आठवत आहे.वसंत दादा पाटील आठवत आहेत.
पण हे सगळ सोयीने...
काय घडल होत नेमक तेंव्हा..?
इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर त्याचे अनेक दूरगामी परिणाम झाले/यातीलच एक महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसच विभाजन झाले इंदिरा गांधी यांना पक्षांतर गत मोठा विरोध निर्माण झाला होता.तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व झुगारून "रेड्डी काँग्रेसची" घोषणा केली..!
यात त्यांच्यासोबत आज ज्यांचा फोटो अजितदादा वापरत आहेत ते यशवंतराव चव्हाण साहेब सहभागी झाले.
खरतर ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण साहेब हेच
रेड्डी काँग्रेसचे" संस्थापक होते परिणामी शरद पवार साहेबांनी देखील रेड्डी काँग्रेसचा रस्ता धरला आणि त्यात ते सहभागी झाले गम्मत म्हणजे वसंतदादा पाटील देखील रेड्डी काँग्रेस मध्ये सहभागी झाले होते.
हे सगळ घडत होत 1977 साली आणीबाणी नुकतीच मागे घेण्यात आली होती लगेच लोकसभा निवडणुका झाल्या आणि राज्यात पहिल्यांदाच काँग्रेसला मोठा फटका बसला आणीबाणीवेळी शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणीबाणीनंतर वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री बनले होते*
आणि राज्यात पहिल्यांदाच जनता पक्ष मोठ्या जोमाने आगेकूच करत होता.
1978 साली विधानसभा निवडणुका झाल्या.आणि अचंबित करणारे निकाल समोर आले जनता पक्षाने 99 जागांसह महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवलं आणि इंदिरा काँग्रेसला 62, तर रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या.त्यात शेकापला 13, माकपला 9 आणि अपक्षांना 36 जागा मिळाल्या होत्या.कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही.
पुढे जनता पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस व रेड्डी काँग्रेस एकत्र आले आणि 7 मार्च 1978 रोजी त्यांनी सरकार स्थापन केले वसंतदादा पाटील (मुख्यमंत्री - रेड्डी काँग्रेस), नासिकराव तिरपुडे (उपमुख्यमंत्री - काँग्रेस) यांच्या नेतृत्वात हे सरकार स्थापन झाले.यात पवार साहेब हे उद्योगमंत्री होते.
पुढे हे नासिकराव तिरपुडे,इंदिरा गांधी यांच्या अत्यंत जवळेचे असल्याने आपल वर्चस्व दाखवण्याचा नादात रेड्डी काँग्रेस आणि मूळ काँग्रेमधील संबंध खराब करत गेले.आणि सरकार चालवणे अवघड होऊन बसले.
त्याचवेळी,महाराष्ट्र टाइम्स चे संपादक गोविंद तळवलकर यांचा एक अग्रलेख संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाला.
लेखाचं नाव होते
हे राज्य जावं ही श्रींची इच्छा.. यातील "श्री" हे दुसरे तिसरे कोणी नसून स्व.यशवंतराव चव्हाण साहेब होते तळवलकर हे चव्हाण साहेबांच्या अत्यंत जवळचे हा लेख छापून आला आणि महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याचं लोकांच्या लक्षात आल.
चव्हाण साहेबांच्या आशीर्वाद घेत पवार साहेबांनी,सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.आणि "समाजवादी काँग्रेसची" स्थापना केली.
1978 सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच पवार साहेबांनी 40 आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडले.यावेळी त्यांच्या सोबत सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे दिग्गज मंत्र्यांनी राजीनामा देत साहेबांच्या सोबत असल्याचं स्पष्ट केले.
विशेष म्हणजे इथ पवार साहेबांनी दुसऱ्याचा पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला नाही.तर 38 व्या वर्षी स्वतःचां पक्ष निर्माण करण्याची धमक दाखवली ही बाब 60+ वय असणाऱ्या दादांना आजदेखील जमत नाही,ही बाब इथ अधोरेखित करण्यासारखी आहे.
पुढे राज्यात समाजवादी काँग्रेस आणि जनता पक्षाचे "पुलोद सरकार" अस्तिवात आल.इथ कोठेही पवार साहेबांनी वसंत दादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता तर स्व.यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंत दादा पाटील यांना विश्वासात घेऊनच हे प्रकरण तडीस नेले होते.याची पुष्टी खुद्द शालिनीताई पाटील (स्व.वसंतदादा पाटील यांच्या पत्नी) यांनी देखील वेळोवेळी केली आहे.
परवाच्या एका मुलाखतीत त्या स्पष्टपणे म्हणतात की,"शरद पवार साहेबांनी जे काही केले ते वसंत दादांना सांगून केले..त्यावेळची ती राजकीय गरज होती..!"
विशेष म्हणजे शालिनीताई पाटील या पवार साहेबांच्या कडव्या टीकाकार राहिल्या आहेत.पण या प्रकरणात मात्र त्यांनी पवार साहेबांच्या सोबत असल्याचं दाखवून दिलं आहे.
हे फार संक्षिप्त लिहिले आहे.
अजितदादांना इतकंच सांगणे आहे की
पवार साहेबांनी 38 व्या वर्षी हिम्मत दाखवत,"स्वत:चा पक्ष" स्थापन केला होता.शिवाय "मुख्यमंत्री" देखील बनले होते.हा इतिहास जगजाहीर असताना,केवळ आपली राजकीय गरज म्हणून भाजपच्या व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटी चे फॉरवर्ड भाषणात वाचवून दाखवू नयेत...!!
आपल्या सारख्या नेत्याला ते शोभत नाही..!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा