Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

संसदरत्न ,खासदार -"सुप्रियाताई सुळे" यांची वनसाळे कुटुंबीयांच्या घरी" सांत्वन "पर भेट.

 



इंदापूर तालुका--प्रतिनिधी

एस.बी. तांबोळी

टाइम्स 46 न्युज मराठी.

मो.8378 081147

              बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांनी "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा साद फाऊंडेशन इंदापूर या चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष सुरज वनसाळे व सामाजिक कार्यकर्ते क्षितीज वनसाळे यांच्या इंदापूर तालुक्यातील नऊदारे (लासुर्णे) येथील घरी सांत्वनपर भेट दिली.



            गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुरज वनसाळे यांच्या आई कालकथीत 'शालिनी रामचंद्र वनसाळे 'यांचे तीव्र ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा सोनाई ग्रुपचे प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सागर मिसाळ, लासुर्णे ग्रामपंचायत सदस्य संतोष (पिपा) लोंढे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा