अकलूज --- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 46 न्युज मराठी.
कोडोली (ता.पन्हाळा ) येथील माजी आमदार कै.यशवंत एकनाथ पाटील यांचा राजकीय वारसा असताना त्यांचें सुपुत्र प्रदिप (बाबा) यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम केले.त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी ठरेल," असे भावोउद्गार प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी काढले.
कोडोली येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी व्यवस्थापक कै.प्रदिप (बाबा) पाटील जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थ स्थानावरून मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात कै. प्रदिपबाबांच्या प्रतिमेची पूजा व्यासपीठवरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.या प्रसंगी स्मिता कळंत्रे आणि पौर्णिमा पाटील या विद्यार्थी-शिक्षकांनी प्रदिप बाबांच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सृजनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकास विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका गुलनास मुजावर,प्रा.संजय जाधव,प्रा.ए. के.बुरटुकणे,एस.के.पाटील, अनिल इंदुलकर,ग्रंथपाल सूरज इंगळे आणि तानाजी मोहिते यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष चौगुले यांनी केले.सुप्रिया कार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रगती पाटील यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा