निसर्गाचा मानवासाठी धडा.
आरं आरं आवकाळ्या
आसं काय करतूयास
ये ये म्हणल्यावर लपून बसतुयास
नको तेव्हा काळ बनूनं बरस्तुयास
पिकं फुलं फळांना मातीत गाडतूयास
बळीराजाच कंम्बरड का र मोडतूयास
धान्याचा चिखल करून
घास आमचा हिसकावून घेतुयास
धुमाकुळ घालून सुड तु उगवतुयस
चुकतोय माणूस म्हणून धडा तु आम्हाला असा शिकवतोयस
होय खरेच की माणूस चुकतोय
कारखान्यातून विषारी धुर सोडतोय
नद्यात केमिकलं , प्लास्टिक फेकतोय
जंगलं तोडून घर आपली बांधतोय
वायू ,जल , ध्वनी प्रदूषण करतोय
म्हणूनच तर ऋतुचक्र पालटले
पर्यावरणाचे समतोल आम्ही ढासळले
आणि निसर्गालाच दोष आम्ही देतोय
सावध हो मानवा म्हणून निसर्ग धडा शिकवतोय , होय धडाच शिकवतोय.
कवियत्री;
नूरजहाँ फकृद्दीन शेख
गणेशगांव ता.माळशिरस.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा