अकलूज --- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 46 न्युज मराठी.
आष्टा (ता.वाळवा जिल्हा सांगली) येथील श्री रेणुका देवीची मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रा भक्तीमय वातावरणात रंगणार आहे.या यात्रा सोहळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीमध्ये आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील श्री रेणुकादेवी (यल्लमा) च्या मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रानिमित्त श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम,जप,यज्ञ,श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि.२५ डिसेंबरला रात्री ७ वाजता परडी सोडणेचा कार्यक्रम व रात्री १० वाजता आणि नाना व रणजीत लाडेगांवकर यांचा बहारदार गाण्याचा कार्यक्रम होणार आहे.मंगळवार दि. २६ डिसेंबरला सकाळी श्री रेणुका देवीची महापूजा व नैवेद्य सकाळी ११ वाजता,दुपारी २ वाजता श्री रेणुका सहस्त्र आहुती होम, आदिमाया श्री रेणुकादेवीची गावातून भव्य पालखी मिरवणूक व दुपारी ५ ते ८ पर्यंत श्री रेणुका देवीच्या देवळासमोर सायंकाळी ५ ते ८ वाजता महाप्रसाद,रात्री १० वा.श्री रेणुका देवीची अग्निहोम प्रवेश (किच) याप्रमाणे आयोजित करण्यात आलेले आहेत.
तरी भाविकांनी रेणुका देवीच्या यात्रेसाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन रेणुकादेवी देवस्थानचे अध्यक्ष तानाजी सुर्यवंशी व सचिव दिलीप पोतदार (पुजारी)यांनी केले आहे.यावेळी
शैलेश सावंत (नगरसेवक,आष्टा नगरपरिषद),रामा बाळू माळी विश्वस्त मंडळ निवृत्ती आत्माराम गायकवाड,सोनाजी पांडूरंग गायकवाड,प्रशांत बाळासोा मुळीक,जगन्नाथ पांडूरंग नांद्रेकर,संजय श्रीरंग घस्ते व सर्व मानकरी व भक्त मंडळी संजय शंकर जकाते,दिलीप वसंत नांद्रेकर,चंद्रकांत यशवंत माळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा