*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
पुण्यात एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून भीम अनुयाई येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
पुण्यातील कोरेगाव भीमा येथे पेरणे फाट्याजवळील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो भीम अनुयायी हे देशभरातून पुण्यात येत असतात. या वर्षी देखील १ जानेवारी रोजी या ठिकाणी येणाऱ्या भीम अनुयायांची संख्या पाहता अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पुणे पोलिसांनी चोख नियोजन केले असून या परिसराला छावणीचे रूप आले आहे. तब्बल ३ हजार ३०० पोलिस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त, ११ पोलीस उपायुक्त हे हा बंदोबस्त सांभाळणार आहे. त्यांच्या खाली ४२ सहाय्यक पोलीस आयुक्त, ८४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील या ठिकाणच्या बंदोबस्तासाठी असणार आहेत. त्यांच्या मदतीसाठी ३ हजार २०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ७०० होम गार्डस आणि SRPF च्या ६ तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत.
१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ अभिवादन सोहळा आणि शौर्य दिन साजरा करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरात कुठलीही राजकीय किंवा धार्मिक सभा घेता येणार नाही. तसेच समाज मध्यमांवर देखील पुणे पोलिस लक्ष ठेवणार आहेत.
कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथे १ जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज आणि पेशवा यांच्यात लढाई झाली होती. यावेळी इंग्रज लष्करातील महार बटालीयनच्या जोरावर इंग्रजांनी पेशव्यांना हरवले होते. या युद्धात महार बटालीयनने त्यांच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधला होता. १ जानेवारी १९२७ ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यात येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा