*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संप कालावधीत लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये याकरिता, आहार पुरवठयाची/अंगणवाडी केंद्र संचालनाची पर्यायी व्यवस्था करावी याकरिता महाराष्ट्र राज्य आयसी डीएस पर्यवेक्षिका कृती समितीच्या वतीने संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून तसेच या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला महाराष्ट्र राज्य आय सी डी एस पर्यवेक्षिका कृती समितीने पाठिंबा दिल्याचे निवेदनात म्हटले आहे
याबाबत महाराष्ट्र राज्य आयसीडीएस पर्यवेक्षिका कृति समितीतर्फे निवेदनातील माहिती अशी की
महाराष्ट्र राज्यात महिला व बालविकास विभागात ग्रामीण नागरी आदिवासी एकात्मिक प्रकल्पात, बालविकास प्रकल्प अधिका-यांची मंजूर ५४३ पदे असून, त्यापैकी ३०२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची जबाबदारी मुख्यसेविकांवर टाकण्यात आली आहे मुख्य सेविका पर्यवेक्षकांची ३८९९ पदे असून त्यापैकी १६९९ पदे रिक्त आहे एकामध्ये थृसाधारणपणे २५ ते ३० अंगणवाडी केंद्र असून, बहुसंख्य मुख्यसेविकांवर एकापेक्षा जास्त बीटांची जबावदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना ५०६० अंगणवाडी केदाची जबाबदारी घ्यावी लागते.
दि.२२.१२.२०२३ रोजी, मा. आयुक्त एकाविसे योजना जिल्हा कार्यक्रम अधिकारी
आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांना पत्र लिहून अंगणवाडी अंगणवाडी संप कालावधीत लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये याकरिता, आहार पुरवठयाची अंगणवाडी केंद्र संचालनाची पर्यायी व्यवस्था करणेचा सुचना दिलेल्या आहेत त्यानुसार, मुख्य सेविका पर्यवेक्षक ग्रामीण नागरी व आदिवासी चा उपयोग करुन मातांना पूरक पोषण आहार, अंगणवाडी सेविका कडून अंगणवाडी केंद्राचा ताबा घेऊन अंगणवाडी केंद्रीय उघडे ठेवून बालके व स्तनदा मातांना पूरक पोषण आहार पूर्व प्राथमिक शिक्षण आरोग्य व संदर्भीय सेवा पुरविण्याचे आदेश दिले आहेत अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राच्या चाव्या मुख्य सेविका पर्यवेक्षकांना देत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला शासकीय कर्मचारी सरपंच आशा वर्कर प्रार्थमिक शिक्षक ग्रामसेवक इत्यादी संघटना आणि पाठिंबा दिला आहे संपाला बाधक असे कोणतेही कृत्य करणार नाही असा त्यांनी निर्णय घेतला आहे अशा परिस्थितीत 22 डिसेंबर 2023 च्या पत्रातील आदेशाचे पालन करणे अशक्य आहे
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कायदेशीर योग्य असून शासनाने त्या मागण्या सहानुभूतीने व
सांमजस्याने सोडवाव्या, अशी विनंती निवेदनात केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा