Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

आनंदयात्री-" जयसिंह शंकरराव मोहिते पाटील "यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त "जयोत्सवास "प्रारंभ विद्यार्थिनींनी लाडक्या दादांना दिल्या लक्ष लक्ष शुभेच्छा

 


अकलुज ---प्रतिनिधी

शकूर--- तांबोळी

टाइम्स 45 न्युज मराठी.

                 शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील उर्फ बाळदादा हे 1डिसेंबर 2023 पासून 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. सतत दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे आनंदयात्री दादासाहेब यांचा जन्मदिन हा एका आनंदी उत्सवाप्रमाणे साजरा करण्याच्या हेतूने लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत 'जयोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. 


जयोत्सवानिमित्त शालेय परिसर हा रंगीबेरंगी फुग्यांनी सुशोभित करण्यात आला आहे. शालेय मैदानावर विद्यार्थिनींनी भव्य अशी फुलांची रांगोळी काढली असून रांगोळीतच रेखाटलेल्या भव्य अशा 75 या संख्येच्या भोवती उभे राहून विद्यार्थिनींनी आमच्या लाडक्या दादांना अमृत महोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा अशा आसमंत दुमदुमवणाऱ्या शुभेच्छा देत रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडले. 


प्रशालेत जयोत्सवानिमित्त 1डिसेंबर रोजी विद्यार्थिनींसाठी स्नेहभोजन व मनोरंजनाच्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संस्थेच्या संचालिका तथा प्रशालेच्या सभापती स्वरूपाराणी मोहिते-पाटील,संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून जयोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक अनिल पिसे ,नामदेव कुंभार, कला शिक्षक विशाल लिके, सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर सेवकांच्या सहकार्यातून जयोत्सवास आनंदी सुरुवात झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा