Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

तांदूळवाडी येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेस 5 डिसेंबर पासून प्रारंभ

 



*अकलूज----प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी*



माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेस दिनांक ५ डिसेंबर पासून सुरुवात होणार असून यानिमित्त सलग तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक,क्रिडा व मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.



      तांदुळवाडी ग्रामस्थांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ५,६ व ७ डिसेंबर रोजी असे सलग तीन दिवस यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.मंगळवार दिनांक ५ डिसेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी ८ ते ११ लेझीम,सकाळी १० ते ५ गझीढोल,सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.दत्ता भोसले (कोंडी सोलापूर) यांचे कीर्तन,रात्री १० वाजता पुष्पवृष्टी त्यानंतर संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक ६ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता श्रीची महापूजा, ग्रामस्थांचे नैवेद्य व महाप्रसाद, सकाळी ८ वाजता सुप्रसिद्ध सनई वादक सोपान पारसे यांच्या सनई वादनाचा कार्यक्रम,सायंकाळी ७ ते १० वाजता ह.भ.प.पांडुरंग गवळी महाराज (भालेवाडी) यांचे जुगलबंदी भारुड,गुरुवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता भव्य दिव्य व उत्साहात पालखी मिरवणूक निघणार आहे, सायंकाळी ७ वाजता म्युझिकल धमाका (कोल्हापुर) यांचे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व यामध्ये आई बापाची माया हे नाटक सादर होणार आहे.यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून प्रतिवर्षीप्रमाणे येणाऱ्या या यात्रेची उत्सुकता तांदूळवाडीकरांना लागून राहिली आहे.गुलालाची उत्साहात होणारी मुक्त उधळण यामुळे अवघे तांदूळवाडी श्री सिद्धनाथ जोगेश्वरीमय होऊन जात असते त्यामुळे दरवर्षी गावकरी बांधवांना या यात्रेची उत्सुकता लागलेली असते.यात्रेनिमित्त लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे,जम्पिंग वगैरे आलेले दिसत आहेत.यामुळे तांदूळवाडी गावामध्ये वेगळाच उत्साह पहावयास मिळत आहे.श्री सिद्धनाथ यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ यात्रेच्या तयारीचे नियोजन जोरकसपणे करताना दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा