Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

विजयवाडी( ता. माळशिरस) ग्रामपंचायत उपसरपंचपदी -रवींद्र मोहन इंगळे ,यांची निवड झाल्याबद्दल सत्कार.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*

                   विजयवाडी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी -.रविंद्र मोहन इंगळे यांची बिनविरोध निवड झालेबद्दल अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती .मदनसिंह मोहिते पाटील (दादासाहेब)व माळशिरस पंचायत समितीचे माजी.उपसभापती .अर्जुनसिंह मोहिते-पाटील (दादासाहेब) यांनी नुतन उपसरपंच रवींद्र इंगळे यांना मानाचा फेटा,हार,श्रीफळ देऊन सत्कार करुन शुभेच्छा दिल्या, 




राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन- जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील ,आमदार-- रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार- राम सातपुते ,भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस- धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती- अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत माजी सरपंच- शिवतेजसिंह मोहिते पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार समारंभ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


          याप्रसंगी विजयवाडी चे सरपंच उमेश भंडारे,विजयवाडी ग्रामपंचायत चे सदस्य.आप्पासाहेब इंगळे, शिवाजी बंडगर, विजयवाडी विकास सेवा सोसयटी चे चेअरमन- दत्तात्रय इंगळे, शिवामृत दुध संघाचे संचालक- त्रिंबक इंगळे ,श्री.विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय विजयनगर चे संचालक- हणुमंत पवार,जेष्ठ नेते -बाळासाहेब इंगळे,.बाळासाहेब होले,.अंकुश इंगळे,.संजय इंगळे,आलमभाई काझी,.उमेश इंगळे,प्रगतशील बागायतदार-- विजय इंगळे,.शरद पवार ,किशोर इंगळे,श्रीकृष्ण रेळेकर,सोशल मिडिया चे अध्यक्ष अल्ताफ शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा