Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

तुळजापूर चे पोलीस अवैध धंदे रोखण्यास निष्क्रिय झाल्याबाबत "रवींद्र साळुंखे "यांचे तुळजापूर तहसिल कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण.

 


टाइम्स 45 न्यूज मराठी नेटवर्क


       तुळजापूर शहर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक तीर्थक्षेत्र असून" आई श्री तुळजाभवानीच्या "दर्शनासाठी महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश कर्नाटक व इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात परंतु तुळजापूर शहरात रोड रोमिओ गुंडगिरी वृत्तीच्या काही लोकांमुळे तीर्थक्षेत्राचे बदनामी होत असून येथे गुटखा मटका दारू इत्यादी अवैध धंदे जोमात चालू असून त्याचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना त्रास होत आहे तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकाकडून अवैध पार्किंग वसुली करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत त्यांच्यावर आणि त्यांच्या गुंडगिरीवर आळा घालण्यास तुळजापूर पोलीस प्रशासन निष्क्रिय झाल्याने तुळजापूर येथील नागरिक रवींद्र ज्ञानोबा साळुंखे यांनी तुळजापूर चे तहसीलदारांना निवेदन देऊन तहसील कार्यालय समोर लाक्षणिक उपोषणास बसले आहेत तरी शहरातील अवैध धंदे बंद करून गुंड प्रवृत्तीवर आळा घालावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा