विशेष प्रतिनिधी---राजु(कासिम)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
तुळजापूर तालुक्यातील विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारा विमा अद्याप न मिळाल्याने आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी
मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल व तुळजापूरचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केली आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे कि
तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जेवढा विमा मंजूर झालेला आहे तेवढा विमा, विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळालेला नाही तरी कंपनीकडून शेतकऱ्यांना मंजूर झालेला सर्व विमा मिळावा.
तसेच अतिवृष्टीमुळे शेतीचे जे नुकसान झालेले आहे त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याना मदत देण्याचे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना द्यावेत. आशी मागणी निवेदना.द्वारे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा