माळशिरस तालुका-प्रतिनिधी
रशिद शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
पीएमपीएमएल प्रशासनाने आठ ठिकाणावरून ज्यादा बसेस(Bhima Koregaon PMPML Bus) चालवण्याचे नियोजन केले आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुस्ती मैदान लोणीकंद, खंडोबा माळ लोणीकंद, सैनिकी शाळा फुलगाव तुळापुर रोड आणि चिंचवड हॉटेल वाय जंक्शन तुळापुर रोड येथून शहराच्या विविध भागात ज्यादा बसेस चालवल्या जातील. तर शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीत पार्किंग वक्फ बोर्ड, जाधव पार्किंग चाकण रोड, तोरणा हॉटेल शिक्रापूर पार्किंग, वढू पार्किंग इनामदार हॉस्पिटल येथून ज्यादा बसेस सोडल्या जातील.
विजयस्तंभास अभिवादनासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ –
(पार्किंग ठिकाणापासून विजयस्तंभा पर्यंत पीएमपीएमएल बसेसची सुविधा करण्यात आली आहे.)
पुणे शहराकडून येणा-या वाहनांसाठी पार्किंग –
लोणीकंद आपले घर शेजारील पार्किंग क्र. 1 – दुचाकी पार्किंग
लोणीकंद आपले घर शेजारील पार्किंग क्र. 2 – चारचाकी पार्किंग
लोणीकंद बौद्ध वस्ती शेजारी पार्किंग क्र. 3 – चारचाकी पार्किंग
लोणीकंद आपले घर सोसायटीचे मागील पार्किंग क्र. 4 – खासगी बस व मोठी वाहने
लोणीकंद मोनिका हॉटेल शेजारील पार्किंग क्र. 5 – दुचाकी पार्किंग
हॉटेल ओम साई लॉजच्या पाठीमागील पार्किंग क्र. 6 – चारचाकी पार्किंग
तुळापुर फाटा स्टफ कंपनी शेजारी पार्किंग क्र. 7 – चारचाकी पार्किंग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा