टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
माळीनगर येथील व्यापारी शिरीष फडे याला धाक दाखवून पैसे लुटल्याच्या आरोपाखाली माळशिरस न्यायालयाने दंड करून व 1 महिन्याची साधी कैद शिक्षा सुनावली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की माळीनगर येथील फिर्यादी व्यापारी शिरीष फडे यांचे दुकानातून सराईत आरोपी नामे सचिन अरुण जगताप माळीनगर यांनी दिनांक 13 नोव्हेंबर 2019 रोजी फिर्यादी शिरीष फडे हे त्यांच्या दुकानात असताना आरोपी "सचिन जगताप "यांनी दुकानासमोर येऊन फिर्यादी यांना खर्चासाठी म्हणून बळजबरीने पैसे मागितले त्यावेळी फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने फिर्यादीचे दुकानातील साहित्याची नासधूस करून दुकानाच्या गल्ल्यातील 2000 रुपये काढून घेऊन गेल्याबद्दल फिर्यादी शिरीष फडे यांनी अकलूज पोलीस ठाणे येथे सदर आरोपी सचिन जगताप विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 384, 452, 323, 506 ,421, प्रमाणे गुन्हा दाखल केला व सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सरडे (बक्कल नं.17 19) यांनी करून आरोपीच्या विरोधात माळशिरस येथील न्यायालयात दोषारोप दाखल केले व सदर खटला चालवला गेला व माळशिरस येथील प्रथम वर्ग दंडाधिकारी एम, एन ,पाटील यांनी सदर खटल्यातील फिर्यादी नेत्र साक्षीदार पंच व तपासी अंमलदार यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले
व सदर गुन्ह्यासाठी आरोपीला दोषी धरून आरोपीला सदर गुन्ह्यांमध्ये भारतीय दंड विधान 323 व 506 मध्ये आरोपीस दोषी धरून आरोपीला 323 --1000 रुपये दंड व पंधरा दिवस साधी कैद तसेच IPC 506 खाली 10,000 रुपये दंड व एक महिन्याची साधीकैद शिक्षा दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सुनावली आहे सदर खटल्याचे कामकाज सरकारतर्फे व्ही,बी, सोनटक्के व श्रीमती बडरे मॅडम सरकारी वकील व कोर्ट पैरवी पोलीस हेड कॉन्स्टेबल (बक्कल नं.17 64) एम.पी.तांबोळी व पोलीस हेडकॉन्स्टेबल( बक्कल.नं. 14 30) रियाज तांबोळी यांनी कामकाज पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा