अकलूज ------प्रतिनिधी
लक्ष्मीकांत ---कुरुडकर
टाइम्स 45 न्युज मराठी.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व संत निरंकारी मंडळ रजिस्ट्रेशन दिल्ली ब्रॕच अकलूज, यांच्यावतीने दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9ते सायंकाळी 5 या वेळेत भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले या रक्तदान शिबिरात 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले
या रक्तदान शिबिरास सोलापूरचे झोनल प्रमुख प.पू. इंद्रपालसिंह नागपाल व अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
सोलापूर क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवार तसेच पिलीव टेंभुर्णी जाधववाडी नातेपुते व इतर भागातून बहुसंख्येने भाविक या रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता अकलूज ब्रांच मधील महापुरुष, माता भगिनी, युनिट 825 अकलूज मधील सर्व सेवा दल बंधू आणि भगिनींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी अकलूज ब्रांच कमिटी सदस्य -लालासाहेब अडगळे, व सेवा दल युनिट 825 चे ,संचालक -दिलीप कांबळे, यांचे विशेष सहकार्य लाभले
दुपारी 1 ते 4 या वेळेत परमपूज्य इंद्रपाल सिंह नागपाल यांच्या उपस्थितीत भव्य सत्संग सोहळा संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा