*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
"दारूच्या "अतिसेवनामुळे" सुखी संसाराची "स्वप्ने" पाहणाऱ्या पत्नीला ..मुलांना आणि आई - वडिलांना एकटे सोडून जाणाऱ्या तरुणाईबद्दल "आत्मचिंतन" करावेच लागेल .
' सांगलीत एका प्रभागात 25-30 वर्षाच्या 3 तरुणांचे दारूच्या अतिसेवनामुळे झालेला मृत्यू धक्कादायक, दखलपात्र आणि मनाला चटका लावणारा ठरला आहे .एकाच महिन्यात
3-3 मृत्यू हा एक प्रकारे संजोग अर्थात "योगायोग" असावा का ???
दारूचे अतिसेवन करणारा , केवळ तो दारूच पीत नाही तर ,पत्नीचे सुख आई चा आनंद ,वडिलांची प्रतिष्ठा ,आणि मुलांचे स्वप्न एका "घोटात" संपवतो.
मुस्लिम धर्मियात पतीचे निधन झाल्यास अथवा तिचा घटस्फोट झाल्यास "दुसरा विवाह" करण्याची परवानगी असते .परंतु अन्यधर्मियात दुसऱ्या विवाहास "मान्यता" नसते. अन्यधर्मीय स्त्रियांना देखील मन आहे ,संवेदना आहेत .विधवा झालेल्या त्या सर्वांना पुनर्विवाहाचा अधिकार असायला हवा की नाही ???
दारूच्या खाईत बुडालेल्या आणि अवघ्या 25 -30 वर्षी "विधवा" झालेल्या त्या पत्नीची- तरुणीची काय "चूक" होती ??? तिने कोणता गुन्हा केला त्याची "शिक्षा" भोगावी लागत आहे ??? आयुष्यभर विधवा हा "शिक्का" तिच्या नशिबी का आला?? त्या लहान असणाऱ्या * मुलीची काय चूक ?? जिथे वडिलांचा "सुरक्षित" हात डोक्यावर असायला हवा होता तेथे आज "पितृछत्र" हरपले. आणि अशा पाषाणहृदयी ,स्वार्थी जगात अनाथ करून तो निघून गेला.
आई - वडिलांनी वयाची "साठी" गाठली असताना ,"आधारासाठी" म्हातारपणी खऱ्या अर्थाने त्यांना मुलाच्या "सोबतीची -आधाराची" गरज असते .परंतु या जगातून अचानक मुलगा "निघून" जाणे त्यांच्यासाठी फार "वेदनादायी" ठरते.
आई -वडिलांचा अतिलाड याला कारणीभूत नसतो का ??? किंवा वडीलच जर मुलासमोर घरी येताना "दारू" पिऊन येत असतील ,अथवा व्यसनाधीन असतील तर त्यांना त्या मुलाला व्यसन करू नको हा सांगण्याचा, व "उपदेश" देण्याचा अधिकार राहत नाही. मुलगा जर दारू ,गांजा व्हाईट पावडर, अथवा अन्य नशा करत असेल आणि वडील देखील दारू ढोसून घरी येत असतील तर मग कोण कुणाला शहाणपणा शिकवायचा ??? कारण वडिलांनी तो अधिकार केंव्हाच गमावलेला असतो .
दारूच्या अतिसेवनामुळे लिव्हर (यकृत ) खराब होते. मानवी शरीरातील विषारी द्रव्ये -अल्कोहोल नष्ट करण्यासाठी पित्त तयार करण्याचे कार्य यकृत करते .परंतु तुम्ही अल्कोहोलयुक्त दारूचं पीत असाल तर "अल्कोहोलिक हिपेटॉयटीस" हा आजार बळावतो . प्रारंभिक उलटी होणे ,यकृताला सूज येणे हीं लक्षणे दिसतात .त्यानंतर कावीळ होते .आणि आणि "मृत्यू" हळू हळू जवळ येऊ लागतो .
जगात कमी प्रमाणात औषध म्हणून बियर पिणारे "लाखो" लोक आहेत. हॉटेल - बियरबार मध्ये "हजारो रुपयांच्या" वाईन उपलब्ध असतात .दारू प्राणघातक असती तर त्यावर जागतिक बंदी आली असती. समाजातील "प्रतिष्ठित" लोक त्याचा आस्वाद घेतात ही देखील वस्तुस्थिती आहे . वास्तविक यकृताला झेपेल इतका "ताण" दिल्यावर "अपाय" होत नाही. परंतु दारूचे अतिसेवन करून यकृताची यंत्रणा "उध्वस्त" केल्यावर, निकामी केल्यावर ते यकृत माणसाला मरणाच्या दाढेत ढकलणारच !
असो , दारूचे अतिसेवन करणाऱ्यांसाठी हा एक "धडा" आहे .युवक हा धडा घेतील याचा "आशावाद" आहे .
इकबाल बाबासाहेब मुल्ला( पत्रकार)
संपादक - सांगली वेध ,
संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा