अकलुज -----प्रतिनिधी
लक्ष्मीकांत कुरुडकर
टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूज ग्रामपंचायतीची लोकप्रिय माजी सरपंच,गोरगरीबांचे कैवारी,सर्वसामान्याचे दैवत किशोरसिंह माने-पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पाटील वाड्यात राजकीय नेते,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते व विविध समाजातील लोकांनी दिवसभर सत्कार व शुभेच्छा करण्यासाठी गर्दी केली होते.
आज सकाळी किशोरसिंह माने-पाटील यांनी अकलूज गांवची ग्रामदैवत श्री अकलाई देवीचे दर्शन घेऊन.नीरा नदी काठावरील कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर बसवेश्वर चौकातील महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले नंतर घरी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शर्मिलादेवी किशोरसिंह माने पाटील व परिवारातील सुहासिनी महिलांनी यांनी त्यांना औक्षण केले.
दिवसभर किशोरसिंह माने-पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक नेते उपस्थित होते.यामध्ये अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामा पांढरे,निमगाव (म)चे के.के.पाटील,भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष मुख्तार कोरबू, अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विठ्ठलराव गायकवाड, सदस्य त्रिंबक (तात्या)गुळवे, अशोकराव जावळे, भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब सलगर, महादेव कावळे,होलार समाजाचे नेते नंदकुमार केंगार, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले, कान्हेरी इस्लामपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश पाटील, सोमनाथ वाघमोडे,बाभुळगावचे रावसाहेब पराडे,बिजवडीचे अण्णा शिंदे, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, लक्ष्मीकांत कुरूडकर, हुसेनभाई मुलाणी,संजय लोहकरे, सामाजिक कार्यकर्ते किरण धाईंजे,सुरेश गंभीरे, बाळासाहेब निचळ,बळीराम लोखंडे,अकलूज मधील व्यापारी वर्ग,खरेदी विक्री संघाचे चेअरमन ,नितीनराजे निंबाळकर,संग्रामनगर येथील साईबाबा सेवा ट्रस्टचे पदाधिकारी,गांधी चौक येथील लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे सदस्य,विजय चौकातील शिवरत्न गणेशोत्सव मंडळाचे सदस्य,वीरशैव लिंगायत समाजाचे पदाधिकारी यांनी किशोरसिंह माने-पाटील यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या तर भ्रमणध्वनीवरुन नातेपुतेचे बाबाराजे देशमुख,सराटी येथील प्रदिपमामा जगदाळे,माळीनगरचे रंजनभाऊ गिरमे, इस्लामपूरचे शंकरराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा