टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवरील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोरील सुनावणीचे वेळापत्रक तयार झाले आहे. 9 जानेवारीपासून ही सुनावणी सुरू होऊन 27 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर अध्यक्ष निकाल देतील. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेना आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. त्या प्रकरणात तारखांवर तारखा सुरू आहेत. गुरुवार पासून राष्ट्रवादी अपात्रतेची सुनावणी सुरू होणार होती, पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत बिघडल्याने तीही पुढे ढकलण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठीही विधानसभा अध्यक्ष वेळ काढणार का, अशी चर्चा होती. पण आता राष्ट्रवादीच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरले आहे.
येत्या 9 जानेवारीपासून ही सुनावणी सुरू होणार आहे. तत्पूर्वी 6 जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपवली जाणार आहेत. याचिकांसाठी अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी 8 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
*साभार*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा