*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
अकलूज (राऊतनगर )येथील रत्नाई बहुउद्देशीय अपंग सेवा संघ संचलित नुरी महिला अपंगाश्रम व वृद्धाश्रम येथे स्वातंत्र्य भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित आसलेले भारतीय सैन्य दलातील सैनिक "शशिकांत किसनराव लोखंडे" यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्यास मानवंदना करण्यात आली
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा नुरजहाँ अरबाज खान मा. सचिव अरबाज शुकूर मोहम्मद खान उपस्थित होते
प्रारंभी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील( काकासाहेब) व रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील (आक्कासाहेब) तसेच मरहूम आर्मी ऑफिसर ;-शकूर मोहम्मद खान (समरी चाचा )यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेच्या वतीने आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गरजूंना साड्या व धान्य वाटप करण्यात आले आणि संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे शशिकांत किसनराव लोखंडे यांचा फेटा बांधून पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख शहाजीराव देशमुख व त्यांचे सहकारी उपस्थित होते त्यांचाही सत्कार संस्थेच्या अध्यक्षा नुरजहाँ खान यांच्या वतीने करण्यात आला
प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांना चहा नाश्ता फराळ देण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले शेवटी संस्थेचे माजी सचिव अरबाज खान यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा