Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

*श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर शाळेत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

              श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय संग्रामनगर शाळेत भारत देशाचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 


      यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज येथील डॉ बाहुबली संतोष दोशी, प्रशाला समिती सदस्य महादेव अंधारे, जिजामाता कन्या प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका मंजूश्री जैन, साखर कारखाना माजी एम.डी प्रसन्न कुमार पवार, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शाहुराज दळवी, प्रशालेचे मुख्याध्यापक मल्हारी घुले आदी उपस्थित होते. 



          सर्वप्रथम डॉ बाहुबली दोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली. 

यानंतर विद्यार्थ्यांची सामुदायिक कवायत पार पडली. वेदान्त घोडके, महेश्वरी उबाळे, ज्ञानेश्वरी उबाळे यांनी देशभक्ती गीत गायन केले. राजनंदीनी देवशेटे, संयोगिता माने, अफताप शेख यांनी भाषणे केली. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यामध्ये तेरी मिट्टी में मिल जावा, फिर भी दिल है हिंदूस्थानी, जय हो, व्हिएतनाम गीत, लढ जाना, दिंडी गीत डान्स सादरीकरण करण्यात आले. 



त्यानंतर संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवलेल्या मुलांच्या संघाचेआणि मुलींच्या संघाने लेझीम प्रात्यक्षिक सादरीकरण केले 


यानंतर मंजूश्री जैन, डॉ बाहुबली दोशी आणि महादेव अंधारे यांनी आपल्या मनोगतातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माझा ५ वर्षाचा नातू आणि ९२वर्षाची आई आणि मी अशा तीन पिढ्यांतील सदस्यांनी एकत्रित कार्यक्रम पाहण्याचे भाग्य मिळाल्याचे प्रसन्न कुमार पवार यांनी भावना व्यक्त केली. 

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश करडे सर यांनी केले. सारे जहाँसे अच्छा समुहगीताने आणि खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी,पालक ,मुख्याध्यापक मल्हारी घुले सर, पुर्व प्राथमिक, प्राथमिक , माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,सेवक यांनी कष्ट घेतले....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा