संपादक ----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
पवारवाडी ता. जि. उस्मानाबाद ग्रामपंचायतचे यापूर्वीचे सरपंच, उपसरपंच ,यांच्यासह काही ग्रामपंचायत सदस्य अपात्र झाल्याने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करत उस्मानाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी उस्मानाबाद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय संतराम ढाकणे यांना नियुक्ती चे पञ दिल्यानंतर आज दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी "पवारवाडी" ग्रामपंचायत "सरपंच "पदाचा पदभार स्वीकारला
संजय ढाकणे यांची सरपंचपदी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करुन गटविकास अधिकाऱ्याने नियुक्ती चे पत्र दिल्या नंतर आणि पवारवाडी ग्रामपंचायत चा पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना सरपंच संजय ढाकणे म्हणाले की, प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सरपंचाची जे सर्व अधिकार कर्तव्य आहेत ते मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून गावातील नागरी सुविधा, विकास कामे, स्वच्छता, पाणी, लाईट ,या ग्रामस्थांच्या नागरी सुविधाला प्राधान्य देणार असून सरपंच पदाचे जे कर्तव्य असते ते शासनाने दिलेल्या विविध योजनांचे पालन करून त्या योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्याचे काम करणार असल्याचे यावेळी सरपंच संजय ढाकणे यांनी सांगितले,
त्याचप्रमाणे उस्मानाबाद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी म्हणुन संजय ढाकणे असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी लोहारा इत्यादी तालुके दुष्काळग्रस्त असल्याने विविध विकास कामांचा पदभार ही यांच्याकडे असून तेही कर्तव्य ते पार पाडत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा