श्रीपूर--बी.टी.शिवशरण.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चीफ अकॏटंट रवींद्र काकडे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचा बेस्ट फायनान्स मॅनेजर पुरस्कार जाहीर झाला असून दि.११ जानेवारी रोजी सकाळी १२ वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , डायरेक्टर शिवाजीराव देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह ,प्रशिस्तपत्र व १० हजार रोख देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराने पांडुरंग कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या आशीर्वादाने व कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या कुशल नेतृत्वामुळे कारखाना नेहमीच देशपातळीवर आपले नावलौकिक करण्यात अग्रेसर ठरलेला आहे. आजपर्यंत कारखान्यास देश व राज्य पातळीवरील ५० हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
कारखान्यामध्ये काकडे यांनी चीफ अकाऊंट म्हणून काम करत असताना कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक व कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या स्वातंत्र्यामुळे कारखान्याच्या नक्त मूल्यांमध्ये वाढ करून कर्ज उभारणी मर्यादा वाढवली,
कायम मालमत्ता तारण क्षमतेचे प्रमाण वाढवण्यासाठी कारखाना स्तरावर प्रयत्न केले. निव्वळ विनियोग उपलब्ध संसाधने यामध्ये वाढ केली कारखान्याचे आर्थिक पतमानांकन बीबीबी प्लस करून कारखान्यास सातत्याने ऑडिट वर्ग अ प्राप्त झाला. कारखान्याकडील शासकीय देणी वेळेवर अदा केली, संस्थेची येणी बाकी असलेल्या शेतकऱ्याकडून व ठेकेदाराकडून वसूल करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून कारखान्याची थकबाकी कमी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर दिली ,त्याचबरोबर मालपुरवठादार यांचीही बिले वेळेत दिली . कामगारांचे पगार बोनस बक्षीस वेळेवर दिले कारखान्यास आयएसओ 9001 2015 मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
कारखान्यास वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेकडून कमीत कमी व्याज दर घेवून कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त कर्ज नॅशनल बँकेकडून घेतले. इत्यादी बाबीचा विचार करून रवींद्र काकडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कारखान्याचे चीफ अकॏटंट रवींद्र काकडे यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे , युटोपीयनचे अध्यक्ष उमेश परिचारक ,कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी , सर्व संचालक मंडळ, खाते प्रमुख व कामगारांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा