Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ७ जानेवारी, २०२४

निराधारांचा आधार वंचितांना न्याय मिळवून देणाऱ्या- पी एस आय" हिना शेख "यांचा व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघ- धाराशिव, च्या वतीने सन्मान.

 


संपादक ----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

         जगात आजही माणुसकी जिवंत असून निराधारांना आधार देणाऱ्या भुकेलेल्यांना पोटभर जेवण देणाऱ्या पोलीस दलातील एक माणुसकीचे ज्वलंत उदाहरण असलेल्या धाराशिव ग्रामीण पोलीस दलातील भरोसा सेल पथकाच्या प्रमुख "हिना शेख "यांच्या भरीव कामगिरीची दखल घेऊन पत्रकार दिनानिमित्त "व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघ -धाराशिव "च्यावतीने आणि धाराशिव चे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे सी सीईओ राहुल गुप्ता धाराशिव सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर इस्माईल मुल्ला यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला

याबाबत शेख यांच्या कार्याची अधिक माहिती अशी की हिना शेख या मूळ औरंगाबादच्या असून 2015 च्या बॅच त्या अधिकारी आहेत त्यांनी 2013 ते 2015 या कालावधीमध्ये फुलंब्री येथे तलाठी पदावर सेवा केली त्यानंतर त्या पोलीस दलात दाखल झाल्या प्रथम नळदुर्ग तालुका तुळजापूर येथील पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांची बदली धाराशिव ग्रामीण पोलीस दलात भरोसा सेल पथक प्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांनी पोलीस दलाच्या भरोसा सेल पथकाच्या माध्यमातून अनेकांचे विखरलेले संसार सुरळीत केले असून ज्या महिला सासरी नांदत नाहीत अशा महिलांची व्यथा समजून घेऊन तिच्या सासरच्या मंडळींना व तिला समोरासमोर बोलून समक्ष दोघांना मार्गदर्शन करून समेट घडवून आणण्याचे सत्कार्य त्यांनी केले तसेच आजतागायत त्यांनी 450 ते 500 कुटुंबांचे अनेक प्रकारचे वाद विवाद मिटवून समेट घडवून मिटवले आहेत शिवाय रस्त्याने जाणाऱ्या मुलींची छेडछाड करणाऱ्या मुलांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले

विशेषतः हिना शेख यांनी कोरोना काळात अनेक नागरिक किंवा निराधार लोकांना उपाशीपोटी राहावे लागत होते अशा लोकांना त्यांनी स्वतः आपल्या घरी स्वयंपाक बनवून येडशी येथील बार्शी रोडवर उड्डाणपूला जवळ बसलेल्या निराधारांना त्यांनी दररोज पोटभर जेवण देऊन त्यांच्या त्या आधार बनल्या ही कौतुकास्पद बाब असून त्यांच्या या विविध आणि भरीव कार्याची दखल घेऊन व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघ धाराशिव यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला शिवाय योग्य माणसाचा योग्य सन्मान केला त्याबद्दल हिना शेख आणि व्हॉइस ऑफ मीडिया धाराशिव यांचे "टाइम्स 45 न्यूज मराठी" च्या वतीने हार्दिक अभिनंदन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा