Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

प्राणप्रतिष्ठा सोहळा नरसिंहपूर परिसरात उत्साहात साजरा

 


इंदापूर तालुका....‌. प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                - आयोध्या येथील प्रभू श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नरसिंहपूर परिसरात मोठ्या जल्लोषात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. गावो गावच्या मंदिरांची स्वच्छता, ग्राम प्रदक्षिणा, कीर्तन, महाप्रसादाचे वाटप, विविध धार्मिक उपक्रमांच्या संयोजनाने परिसर 'राममय' झाला होता.

   आयोध्या येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त गावोगावच्या मंदिरांची स्वच्छता करण्यात आली त्यानंतर विद्युत रोषणाई व फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले होते. ठिकठिकाणी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमांचे पूजन विधिवत करण्यात आले. या आनंद उत्सवानिमित्त रामभक्तांनी घरावर गुढी उभारून, भगवे झेंडे, तोरण, परिसरात पताका लावले होते.


    पिंपरी बुद्रुक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रामायणाच्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन व आरती घेण्यात आली. यावेळी अशोक बोडके, बाळासाहेब घाडगे, वर्धमान बोडके, संदिपान पडळकर, शिवाजी बोडके, अमोल घोडके, युवराज बोडके, महेश सुतार आदिंनी सहभाग घेतला.



    गणेशवाडी ग्रामस्थांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा केला यामध्ये मंदिरांना विद्युत रोषणाई व फुलांनी सजवण्यात आले होते गावातील महिलांनी डोक्यावर श्रीफळ व कलश घेऊन ग्राम प्रदक्षिणा पूर्ण केली. गावातील प्रमुख मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर हभप राम शेळके महाराज यांचे कीर्तन होऊन ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले..

   त्याच पद्धतीने टणू, गिरवी, नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरातील श्रीराम मूर्तींला सर्वांनी फुले वाहून रामनामाचा जयघोष केला. गावोगावी फटाक्यांची आतश बाजी व दीपोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.

फोटो - पिंपरी बुद्रुक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रामायण अध्यायाचे वाचन व पूजन करण्यात आले.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा