Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

अभ्यासक्रमा बरोबर आम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासात अग्रेसर ---अमोल फुले.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

             अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे कृष्ण प्रियोत्सव मोठ्या संख्येने व उत्साहात दोन दिवस पार पडला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी क्रमिक अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. भविष्यातील कलाकाराचा पाया इथेच घातला जातो, असे म्हटल्यास वावगे होणार नाही असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी उद्घाटनप्रसंगी काढले.       

 

 दिनांक ११ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता कृष्ण प्रियोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक बाळासाहेब सणस व वसंत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रारंभी स.म.शंकरराव मोहिते पाटील व अक्कासाहेब, विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करण्यात आले. 


इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी तयार केलेली दालनं त्यात कृषी, विज्ञान, कला, रांगोळी, पुष्परचना प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांची कल्पकता, नाविन्यता व विविध गुण दिसून आले. खरे तर डिसेंबर-जानेवारी महिना आला, की शाळांसह विद्यार्थ्यांना वेध लागतात ते सांस्कृतिक कार्यक्रमांचे. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून एक व्यासपीठ शाळा मुलांना उपलब्ध करून देत असते. अभ्यासाबरोबर मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा यासाठीचा हा सर्व खटाटोप असतो. कलाविष्काराच्या सादरीकरणाद्वारे शाळांना स्वतःचे वेगळेपण पालक, समाजासमोर मांडण्याची एक संधी मिळते. दुसरा दिवस म्हणजे शुक्रवारी कावी सम्मेलन व शेलापागोटे कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध कवी अशोक पत्की यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून उद्घाटन केले. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक कविता वाचून दाखवल्या तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वलिखीत कविता म्हटल्या. त्यांना उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी दाद दिली. पाचवी ते बारावी विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांवर टाकलेले शेलापागोटे वाचून दाखवत असताना स्वतः व विद्यार्थ्यांनी हास्यकल्लोळात दाद दिली. 

माळशिरस तालुक्याचे जाणते राजे, आमचे प्रेरणास्थान, आनंदयात्री, मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत स.म.शंकरराव मोहिते पाटील स्मृतीभवन शंकरनगर येथे दोन्ही दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. इयत्ता पाचवी ते बारावी विद्यार्थ्यांच्या गीतांचे चार गट तयार केले. पहिला गट पाचवी ते सहावी गटात कॅसेट आठ गीते सादर केली. त्यात देवा गणेशा, बीते कलसे, झुंजूमंजू, लगीन देवाचे, गाडी घुंगराची अशी झाली. गट दुसरा सातवी ते आठवी मध्ये पाश्चिमात्य नऊ गीते झाली. गट तिसरा अकरावीसाठी थीम नृत्य दिले होते त्यात स्वच्छता अभियान, लस, भिकारी गरीबी, रामायण व शाळा असे विषय घेतले होते. गट चौथा इयत्ता नववी मध्ये जो रंगीला वारा, आले मराठे, कृष्णवतार, मर्दानी, इंडियावाले, आई जगदंबे अशी नऊ गीते झाली. वरील सर्व गटातून प्रत्येकी तीन क्रमांक काढले त्यामध्ये गट पहिल्यात प्रथम- 6 वी ह व ग, द्वितीय - 5 वी ई व फ

तृतीय -(विभागून) - 6 वी क व ड, 6 वी ई व फ. गट दोन मध्ये प्रथम- 7 वी क व ड, द्वितीय - 7 वी ई व फ, तृतीय - अ व ब. गट तिसरा प्रथम- 9 वी ह, द्वितीय- 9 वी अ, तृतीय -(विभागून)- 9 वी क,ब आणि विशेष गीत - एन सी सी विद्यार्थी आणि शेवटचा गट चौथा अकरावी मध्ये प्रथम-(विभागून) 11 वी ड, अ द्वितीय (विभागून) 11 फ, ब तृतीय-(विभागून) 11 वी ई, व्यवसाय विभाग असे नंबर काढण्यात आले. 

सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तर उपस्थितीमध्ये विद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य काझी साहेब, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, व्यवसाय विभागाचे उपप्राचार्य विनायक रणवरे, विद्यार्थी प्रतिनिधी अर्जून शिराळ, विद्यार्थीनी प्रतिनिधी प्रेरणा गायकवाड, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी व मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होत, 


             *चौकट*

शाळेतील अशा कार्यक्रमांमुळे अभ्यासासाठी एक ऊर्जा मिळते. काही तरी वेगळे करण्याची आम्हांला संधी मिळते. शिवाय मोठे उत्सव केल्यामुळे शाळेचे नावही होते. आपली शाळा एक मोठा इव्हेंट करते, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे शाळेचा अभिमान वाटतो. अभ्यास आणि सराव याचे नियोजन सर्व शिक्षक खूप चांगल्या प्रकारे करतात, त्यामुळे तशी गडबड होत नाही. आणि त्यानंतर येणाऱ्या परीक्षेसाठीही ताण येत नाही,' असे मत विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी प्रेरणा गायकवाडने मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा