उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
भारतीय प्रजासत्ताक दिन लवंग २५/४ येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमधील लहान मुलांनी विविध कार्यक्रम सादर करून साजरा केला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यदलातील सैनिक सुभेदार शब्बीर शेख ,हवालदार मेजर मनोहर भोळे,हवालदार मेजर गणपत जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्यास मानवदंना देण्यात आली.
शाळेतील चिमुकल्या बालकांनी देशभक्तांच्या आठवणीत स्फूर्तीदायक भाषणे केली.देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कु.काव्या चव्हाण, प्रियदर्शनी चव्हाण,सारा शेख,शर्वरी रेडे,सोफिया कोरबू,विजयलक्ष्मी भोळे या विद्यार्थिनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले याच्या जीवन कार्याचा आढावा घेणारी ओवी सुरेल आवाजात गाऊन पालक व पाहुण्यांची शाबासकी मिळवली .
प्रमुख पाहुणे सुभेदार शब्बीर शेख यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,वयाची २८ वर्षे सीमेवर राहून देशसेवा केली आहे.आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात.या शाळेतील विद्यार्थी हिंदी इंग्लिश व मराठी भाषेतून उत्कृष्ठ व निर्भीडपणे भाषण करीत असल्याचे पाहून कौतुक वाटते.मुलांनी अशीच प्रगती करीत रहा आणि देशसेवेसाठी सदैव तत्पर रहा असे आवाहन केले.
या प्रसंगी शाळेच्या संचालिका नूरजहाँ फकृद्दीन शेख,समाज सेविका अस्मिता कोकाटे,शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष समाधान जगताप,उपाध्यक्ष दशरथ दगडे,पालक संघाचे अध्यक्ष रामचन्द्र चव्हाण,उपाध्यक्ष रेवन भोळे,रुपाली मिटकल,शीतल भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव कोळेकर, रणजित चव्हाण,रमेश गायकवाड,नौशाद शेख,मोईन शेख,इम्रान शेख,गुलशन नशीब शेख यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा