टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने जो ग्राहक दिनाचा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो या कार्यक्रमास सर्व शासकीय माळशिरस तालुक्याचे अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे परंतु एकही अधिकारी या कार्यक्रमाकडे येत नाही हे दुर्दैव आहे याबाबत योग्य ती समज सर्वा आधिकार्यांना द्यावी अशी मागणी ग्राहक तक्रार निवारण मंच बारामती, कोल्हापूर रत्नागिरी सोनलचे श्रीकांत बाविस्कर यांनी
तहसील कार्यालय माळशिरस,
ग्राहक पंचायत महाराष्ट्र व अखिल भारतीय ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात बोलत होत यावेळी ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र विद्युत निर्माण नेमलेल्या ग्राहक तक्रार निवारणाची मध्ये ग्राहकाला कोणती फी न करता आपली तक्रार नोंदवता येते व ग्राहक तक्रार निवारण मंच मध्ये एकही रुपयांना खर्च करता कोणताही वकील न लावता आपली केस आपण लढू शकतो व आपण विद्युत महामंडळाकडे महामंडळाच्या तक्रारीचा न्याय मागू शकतो असे त्यांनी सांगितले
यावेळी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांनी यावेळी "वस्तू खरेदी करताना काय काळजी घ्यावी तसेच ग्राहक कायदा 1986 बाबत अभ्यासपूर्ण विवेचन करून ग्राहकांनी प्रत्येक ठिकाणी कसे जागृत राहिले पाहिजे याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ग्रामपंचायत महाराष्ट्राचे माळशिरस तालुका अध्यक्ष डॉ दत्तात्रय थोरात म्हणाले की ग्राहकाची फसवणूक किती झालीं हे महत्त्वाचे नसून ती फसवणूक का झाली आणि त्या संदर्भात आपण दाद मागितली पाहिजे त्यामुळे ग्राहकांनी वस्तूची किंमत न पाहता आपल्याला न्याय मिळवण्यासाठी ग्राहकाने जरूर जागृत राहिले पाहिजे असे सांगितले
यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष उपेंद्र केसकर यांनी ग्राहक कायद्याविषयी मार्गदर्शन केले. ग्राहक कायदा 2019 हे ग्राहकाचे कवच कुंडल आहे याचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले देशातील ग्राहक चळवळ,अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना,कार्यपद्धती,2019 कायद्यातील तरतुदी या बाबत त्यांनी भाष्य केले तसेच तालुक्यात चालू असलेल्या ग्राहक प्रबोधनाची माहिती दिली.उपस्थितांना ग्राहक चळवळीत सहभागी होणेचे त्यांनी आवाहन केले.
लोकशाही दिन सुरू करणेबाबत लेखी निवेदन देण्यात आले.
निमंत्रण देऊनही इतर शासकीय अधिकाऱ्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
या वेळी अमित पुंज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन महादेव भोसले यांनी केले.या कार्यक्रमासाठी पुरवठा निरीक्षक सुशांत केमकर,दशरथ जरग,सुप्रिया वजाळे मॅडम, आमीर तांबोळी, आकाश कदम, अजर मणेरी ,बाळासाहेब झंजे यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी सोलापूर ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य भगवान घुगरदरे , दस्तगीर मुलांनी वामनराव वाघमोडे, हारून शेख,स्वप्नील राऊत,संजय हुलगे,तानाजी वाघमोडे, सिद,ऋषिकेश थोरात तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा