Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

अकलूज (पाटील वस्ती )येथे कृष्णानंद यशोदीप पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

 


अकलूज ----प्रतिनिधी

  केदार लोहकरे

 टाइम्स 45 न्युज मराठी

           कृष्णानंद विद्यामंदिर येथे शिक्षण घेऊन विविध उच्च पदे भूषविणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा 'कृष्णानंद यशोदीप पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

       पाटीलवस्ती-अकलूज येथील कृष्णानंद विद्या मंदिरात 'कृष्णानंद सोशल फाउंडेशन'च्या वतीने विद्यालयात शिक्षण घेऊन आयएएस,आयपीएस,प्राचार्य, शिक्षक,पोलीस अधिकारी सरकारी उच्चपदस्थ नोकरी आदी ठिकाणी यशस्वीरीत्या कार्य करीत विद्यालयाचे नावलौकिक वाढविणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा 'कृष्णानंद यशोदीप पुरस्कार,  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक वसंतराव जाधव रामचंद्र गायकवाड शालेय व्यवस्थापन समितीचे सर्जेराव कदम डॉ.तानाजी कदम,ज्ञानदेव वाघ डॉ.सुरज पवार यांच्या उपस्थितीत होते.



          यावेळी फाउंडेशनच्या कृष्णानंद विद्या मंदिरात गतवर्षी विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान हि यावेळी करण्यात आला‌.तसेच विद्यार्थ्यांना कंपास,वही,गणवेश, पेन आदी साहित्यांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी कृष्णानंद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष वेताळ काटकर उपाध्यक्ष सुरेश यादव सचिव राजेंद्र गायकवाड खजिनदार देविदास सांळुखे सह सचिव नागेश गुरव जे.के.काटकर आंनता सुरवसे,विठ्ठल गायकवाड, आर्जुन सांळुखे,सोपान घुले,भारत सांळुखे,राजेश तांबोळी व सर्व सदस्य,मुख्याध्यापक प्रताप तोरणे,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 



        त्यावेळी प्रा.ज्ञानेश्वर कुंभार (पुणे) व डॉ.मधुकर धाईजे (पुणे) यांनी आपले मनोगतामध्ये शालेय शिक्षण जीवनातील अनुभव सांगत किस्से सांगितले 



         यावेळी जयसिंह मोहिते पाटील यांनी पूर्वीच्या आणि आताच्या शैक्षणिक व्यवस्थेत बदल झाला असं आहे मात्र पूर्वी वाडी वस्तीवर शिकणे अवघड होते.कृष्णानंद विद्यामंदिरची स्थापना सुमारे ४५ वर्षांपूर्वी झाली असून माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कृष्णानंद सोशल फाउंडेशन स्थापना करून उच्च पदावर गेलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान केला ही खरंच कौतुकास्पद बाब असल्याचे मत व्यक्त केले.



         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एन.मुलाणी यांनी केले. आभार वेताळराव काटकर यांनी मानले तर सुत्रसंचलन एस.जे.अनगळ यानी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा