श्रीपूर--बी.टी.शिवशरण.
सामाजिक सांस्कृतिक वैचारिक परिवर्तनवादी चळवळीतील समतेचा ममतेचा एकतेचा व आधुनिक विचारांचा महाराष्ट्र आज विषमतेकडे वाटचाल करु पहात आहे ज्या थोर समतावादी मानवतावादी विचारवंतांनी साधुसंतानी राष्ट्र पुरुषांनी अखंड महाराष्ट्राचे हित पाहिले सामाजिक समतेचा जागर केला तो महाराष्ट्र जाती धर्माच्या झुंडशाही चे गढुळ चिखलात बरबटला जात आहे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. यांनी रयतेचे राज्य आणले स्वराज्याची संकल्पना मांडली महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज राष्ट्रसंत गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र पुरोगामी व शैक्षणिक सांस्कृतिक आध्यात्मिक सामाजिक परिवर्तनाचे रणशिंग फुंकले त्यामुळे महाराष्ट्र सुसंस्कृत वैभवशाली बनला ज्या महाराष्ट्रात सामाजिक एकतेची बीज रुजवली तो महाराष्ट्र दुभंगलेल्या अवस्थेत नेण्याचे व जातीय तेढ वाढवण्याचे पातक होत असताना पहाण्याचे दुर्भाग्य छत्रपतींचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्राला आले आहे इथे ज्ञानाची पुजा केली जाते बुद्धीवादी आदर्श मानले जातात एकमेकांना आधार देणे त्यांना पुढे नेणे कोणीही उपाशीपोटी झोपू नये त्यांना आपल्या ताटातील अर्धी भाकर देणे ही आपली संस्कृती परंपरा आहे पण आज धर्म जात आरक्षण या मुद्द्यांवर इथली संस्कृती मानवता एकता अखंडता धोक्यात आणली जात आहे आरक्षण हा मुद्दा इथली सामाजिक व्यवस्था उध्दवस्त करु पहात आहे संविधान पायदळी तुडवून झुंडशाही ऊर बडवून घेत आहे राज्य चालवण्याची जबाबदारी असणारे राज्यकर्ते यांनी आपली नैतिक जबाबदारी झटकण्याचा व निष्क्रिय असल्याचा जणू पुरावा दिला राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी घेतलेले व संविधानाच्या चौकटीत राज्य चालवण्याची शपथ घेतलेल्या सरकारने पळपुटेपणा दाखवला आहे गाजर दाखवणं काय असते हे महाराष्ट्र सरकारने आरक्षणाचे बाबतीत जनतेला दाखवून दिले आहे संविधानात नमूद केलेल्या न्याय नीती धर्माचे पालन करुन राज्य चालवण्याची जबाबदारी असताना सरकार पळपुटे निघाले आहे आरक्षण काय आहे किती टक्के आहे कोणत्या प्रवर्गातील समाजघटकांना देणं बंधनकारक आहे याची अंमलबजावणी करणे व त्याचा गैरफायदा गैरवापर होणारं नाही याची खबरदारी घेणं हे कर्तव्य सरकारने पार पाडणे आवश्यक आहे पण मतांच्या राजकारणासाठी सर्व समाजाला झुंजवत ठेवणं व सामाजिक दरी वाढवण्याचे कामं सरकार कडून होत असल्याने आरक्षणाचे भिजत घोंगडे कायम अडकून पडले आहे बहुजनांच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून शाळा सुरू करणारे पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा महाराष्ट्र आज कोणत्या दिशेने चालला आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करताना महाराष्ट्रातील सर्व मावळे एकत्रित केले तेव्हा कुठे ही त्यांनी एका विशिष्ट जातीला धर्माला प्रमाण मानले नाही त्यामुळे ते रयतेचे राज्य निर्माण केले स्त्री शिक्षणाची गंगोत्री असलेल्या महाराष्ट्रात सावित्रीमाई फुले ज्योतीबा फुले स्वतंत्र भारताचे संविधान लिहिणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे रत्न आहेत साहित्य कला संस्कृती अध्यात्म थोर महात्म्यांच्या विचारांचा वारसा असल्याने प्रगत महाराष्ट्र सशक्त महाराष्ट्र म्हणून संपूर्ण देशात महाराष्ट्राची ओळख राहिली आहे पण आज ती ओळख पुसली जात आहे न्याय परंपरा धोक्यात येऊ पहात आहे राज्यातील ओबीसी मराठा यांच्यात आरक्षणावरून सामाजिक जातीयवादी दरी वाढली आहे दोन्ही समाजाला न्याय देण्याची जबाबदारी व आरक्षण कसे देता येईल व कोणाचं काढून दुसऱ्यांना देता येणार नाही हे सांगण्याची नैतिकता व अधिकार या शासनाकडे नसल्याने आरक्षणाचा वाद उफाळून आला आहे ओबीसी व मराठा बांधव एकमेकांना पाण्यात पहात आहेत शासन म्हणून जी जबाबदारी असते ती शासनाने गमावली आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची जबाबदारी शासनाने निर्माण केली आहे त्यामुळे महाराष्ट्र विषमतेच्या दिशेने वाटचाल करत आहे साधुसंतांचा विचारवंतांचा महाराष्ट्र ओशाळला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा