*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
लेखक इंद्रजित पाटील लिखित ' जीवनाचा उपासक - कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी ' चरित्रग्रंथाला आठवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला.मुळातच या ग्रंथाचे लेखन हे लालित्यपूर्ण असून मायबाप साहित्य प्रतिष्ठान,टेंभुर्णी,ता.माढा,जि.साेलापूर यांनी हा पुरस्कार जाहीर केला.या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रतिष्ठानचे चेअरमन श्री. शंतनु उंट,सचिव श्री.विनाेद तांबे व सर्व पदाधिकारी यांचेकडून आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत महाराष्ट्रातून अनेक साहित्यकृती प्राप्त झाल्या होत्या.यातून या ग्रंथाची पारदर्शकपणे निवड करण्यात आली.या पुरस्काराचे वितरण फेब्रुवारी-२०२४ मध्ये हाेणार आहे.असे मायबाप साहित्य प्रतिष्ठानने घाेषित केले.
कर्मवीर लाेहाेकरे गुरुजींचे धाकटे सुपुत्र श्री.पंडितराव लाेहाेकरे,जीवनराव लाेहाेकरे, जनसेवक अमाेल (भैया) कुतवळ,तुळजापूर,चंद्रकांत पाटील,संजय भड, अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी त्यांचे विशेष काैतुक केले व पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा