टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
"गुजरात सरकार व नराधम बलात्कारी यांच्यात संगनमत होती.माफीचा अधिकार गुजरात सरकारचा नव्हे महाराष्ट्र सरकारचा होता...त्या मुळे आमचा २०२२ मध्ये दिलेला निर्णय रद्द करत आहोत.या प्रकरणात गुजरात सरकार थेट कोर्टाची दिशाभूल केली.हे फसवणुकीचे अनोखे प्रकरण आहे.गुजरात सरकारने तथ्ये लपवलीत.एका महिलेला समाजाने कितीही कमी लेखले किंवा ती कोणत्या धर्माची असो.पण कायद्याच्या दृष्टीने ती आदरास पात्र आहेत.एखादे सरकार ही नराधमांना वाचविण्यासाठी धर्माचे पांघरून घालते.सूट देते...माफी देतंय... आणि कोर्टाला नाईलाजास्तव सांगावे लागते....हे तर गुन्हेगारांशी सत्तेचे साटेलोटे आहे." ७५ वर्षाच्या स्वातंत्र्य इतिहासात असले ताशेरे ऐतिहासिक आहेत.कधी नव्हे कोर्टाने चक्क एका सरकारला बेजबाबदार नव्हे विशिष्ठ जातीच्या धर्माच्या आड नराधमांची बाजू घेतल्याचे ताशेरे ओढले आहे.हे देशाच्या,घटनेच्या एखाद्या लोकशाही देशाच्या सत्तेची अब्रू वेशीला टांगणारी आहे. नेते जेव्हा सत्ता ग्रहण करतांना सर्वांना समान न्याय,आकस बुद्धीने वागणार नाही,असली शपथ घेतात व नंतर आपल्या शपतीशीच लबाडी करतात तेव्हा त्यांना लाज शरम वाटत नाही का?बिलकीस बानो प्रकरणाचा निकाल देशाच्या दशा व दिशा बदलणार ठरणार आहे.सत्तेची मस्ती ठीक आहे पण बेलगामपणा नकोय...!!
२८ फेब्रुवारी २००२ चे हे प्रकरण ...गुजरात दंगलीचा काळा दिवस.बिलकीस बानो आपल्या अपत्य नातेवाईका सोबत जीव मुठीत धरून पळणार होती...त्यातच एका संतप्त हल्लेखोर...गुंड दंगेखोरांनी तिच्या घरावर हल्ला केला....तेव्हा बिलकीस पाच महिन्याची गरोदर होती...नराधमांनी बिलकीस तीची आई व चुलत बहिणी वर सामूहिक बलात्कार केला...वहिनीच्या दोन दिवसांच्या मुलाला आपटून मारले....बिलकीसच्या काकू व चुलत भावंड सह कुटुंबियां सह सात जणांना अक्षरश क्रूर हत्या केली.२००८ साली ११ नराधमांना जन्मठेपेची शिक्षा दिली.... *केंद्र व गुजरात सरकारच्या कृपेने नराधम २०२२च्या स्वातंत्र्य दिवसाच्या मुहूर्तावर बाहेर पडलेत.बिलकीस गेली २१ वर्षे न्यायचा लढा लढत आहे.....आज ही लढली....जिंकली....आता तरी देशाच्या महिला वंदन करण्याची भाषा करणारे बिलीकस सारख्याच आई-बहिणीची अब्रू लुटणाऱ्यांची अब्रू राखणार का?की सत्तेसाठी आपलीच अब्रू वेशीवर टांगणार?
ज्या बिलकीसच्या कुटुंबियांना पकडलं....ठोकलं... ठेचले...मारलं...त्या मारेकऱ्यांना सोडण्यास केंद्राच्या गृहविभागाने आततायीपणा दाखवलं हे दस्तुरखुद्द गुजरात सरकारने कोर्टात सांगितले. *त्या मुळे लाज वाटतं अश्या सत्ताधाऱ्यांची.... समाजात बेलगामपणे वागणाऱ्यांची बाजू घेता.खऱ्या अर्थाने त्या सुप्रीम कोर्टाला सलाम ज्याने देशाच्या समाजाची लाज वाचवली.देश-विदेशात बिलकीसच्या मारेकऱ्यांना सोडल्या नंतर लोकशाहीचे, धर्मनिरपेक्षतेचे धिंडवडे निघाले होते.या निर्णयाने तरी देशाची... आमची अब्रू वाचली.दुर्दैव या गोष्टीचे की मारेकरी ब्राम्हण होते म्हणून एका नालायक भाजप आमदाराने ब्राम्हण संस्कारी असतात म्हणून त्यांच्या सुटकेचे समर्थन केलं.काय बेशरमपणा आहे.महिला विशिष्ठ समाजाची आहे म्हणून त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाची तुम्ही पाठराखण करता?थु...थु....!असल्या नेत्यांना निवडून आणणाऱ्या जनतेलाही शरम वाटली नसेल.
एकूणच बिलकीस प्रकरणाचा निकाल हा ऐतिहासिक,"मिलका पत्थर"आहे,ज्या प्रकारे जस्टीस बि,व्ही,नागरत्ना व जस्टीस उज्जवल भुयान सत्तेला उघड केलंय व एका प्रकारे संदेशही दिला.तुम्हाला कायद्या समोर बेलगामपणे वागता येणार नाही.गुजरात निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने हा निर्णय घेतला होता.निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेसाठी एव्हढा आसुसलेपणा?माणुसकीचे चिंधड्या उडवायला ही लाज नाही.गुजरात दंगलीत तब्बल दोन हजार मुस्लिमांची अक्षरश कत्तल केली गेली.दिवंगत खासदार एहसान जाफरिंची वृद्ध विधवा न्याय साठी आज ही कोर्टाच्या पायऱ्या चढत आहेत.त्या शरीराने थकल्या पण हरल्या नाही.न्यायसाठी त्या महिलेला ही सत्तेची लबाडी आड येत आहे.गुलबर्ग सोसायटीत २८ फेब्रुवारीस त्यांच्या सोबत ७० महिला मुलांना अमानुषपणे जाळण्यात आले.अंगावर शहारे आणणारी अशी प्रकरणे आहेत.तेव्हा पासून भाजपचीच सत्ता अन न्याय देण्यासाठी तेच आडवे आलेत.कारण न्याय मागणारे मुसलमान आहेत.ही एका धर्मनिरपेक्ष देशाची कहाणी....मात्र सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने देशवासीयांचा...आमच्या सारख्या पत्रकारांचा विश्वास वाढवला....होय कायदा जीवंत आहेत....सत्ता किती तरी मस्तवालपणा करत असली तरी त्यांना लगाम लावण्यासाठी....!!तो पर्यंत आशा ठेवू या...!!(जयहिंद)
*अशफाक शेख,-वरिष्ठ* *पत्रकार,सहारा औरंगाबाद* ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा