*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा निकाल लागणार आहे.४० नमकहराम गद्दार अपात्र होणार आहेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या हातात हा निकाल दिला जाणार आहे परंतू राहूल नार्वेकरांकडे निरीक्षण केल्यास राहूल नार्वेकर ४० गद्दारांना अपात्र करतील असे वाटत नाही कारण राहूल नार्वेकर हा न्याय देणारा आहे पण हा न्याय देणाराच आरोपीच्या घरी जाऊन पाकीट घेऊन येत असेल तर न्याय हा मिळेलच असे वाटत नाही.राहूल नार्वेकर अचानक आजारी पडतात आणि अचानक आजारातून उठून आरोपीला भेटायला जातात याला काय म्हणावे ??
भाजप सत्तेत आल्यापासून या देशात ना निवडणुका लावल्या जात आहेत ना जनतेच्या प्रश्नांना न्याय दिला जात आहे.महाराष्ट्रात सर्वत्र हुकूमशाही बरबटलेली आहे.सत्तेत बसलेली ढेकण जनतेचे रक्त पित आहेत.ही हुकमशाही एक दिवस या महाराष्ट्रातील जनतेच्या नरडीचा घोट घेणार हे त्रिवार सत्य आहे.काय मस्ती चाललीय काय उन्माद वाढलाय हा देश जनू यांच्या बापाची मालमत्ता असल्यासारखे वागत आहेत.या सत्ताधार्यांची मस्ती उतरवायची असेल तर प्रत्येक माणसाने,स्त्रीयांनी,तरूणांनी आता ज्वलंत क्रोधाने पेटून उठलच पाहिजे अन्यथा या देशाचा सत्यानाश झालाच म्हणून समजा.
या देशात कायद्यावर आमचा विश्वास आहे सध्यातरी कायदा विकला गेला नाही असे आम्ही समजतो.या राहूल नार्वेकरला ४० मिंधे गटाचे आमदार अपात्र करायला ८-८ महिने लागतात हा राहूल नार्वेकर त्या फडणवीस बरोबर परदेशात फिरायला जातो.अपात्र मुख्यमंत्र्याच्या घरी डीनरला जातो हा काय पोरखेळ चाललाय या महाराष्ट्रात ? कायद्याची चेष्टा लावली आहे या टोळीने.विधान सभेचा अध्यक्ष लहान मुलांसारखे चाळे करीत असेल तर अशा माणसाला विधानसभेच्या त्या सर्वोच्च खुर्चीवर बसण्याचा काय अधिकार ? जनतेने तुम्हाला मत देऊन आमदार केल आहे पैशासाठी आणि खुर्चीसाठी कायद्याची वाट लावण्यासाठी आमदार केल नाही याच भान या नार्वेकर आणि मिंधे टोळीने ध्यानात घ्यावे.
आज नार्वेकर काय निकाल देतो हे आम्ही अगोदरच ओळखल आहे.हा राहूल नार्वेकर ठाकरेंना कधीच न्याय देणार नाही हा फक्त दिवस वाढवितो जर तसे असले असते तर ३ महिन्याच्या आत शिंदेसह ४० गद्दार अपात्र केले असते.नार्वेकरच्या दाळ मधे काळे खडे आहेत फडणवीस,शिंदे,पवारगट आणि नार्वेकर एकाच खोलीत बसून व्ह्यूवरचना आखत आहेत.न्याय हा विकला गेला आहे जसा नार्वेकर विकला गेला तसा..
आजचा निकाल काहीही लागो परंतू आम्ही मरेपर्यंत उद्धवसाहेबांसोबतच राहू.शिवसेनेशी आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या रक्ताशी गद्दारी कधीच केली जाणार नाही.न्याय हा मागून मिळत नसेल तर तो लढवून मिळविला जातो.
आज नार्वेकर जरी विकला गेला तरी जनतेचे न्यायालय आमच्यासाठी खुले आहे त्या देवतासमान जनतेसमोर आम्ही न्याय मागू आणि या सत्तेत बसलेल्या रक्तपिपासू गद्दारांना धुळीस मिळवू.
*जय महाराष्ट्र.*
*अतुल श्रावण भवर,सोलापूर.*
*मो नं ९९६००९०००१.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा