Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २८ जानेवारी, २०२४

*विजयसिंह मोहिते विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध--- जयसिंह मोहिते पाटील*

 


अकलूज ----प्रतिनिधी

  केदार लोहकरे

 टाइम्स 45 न्युज मराठी

          वाघोली (ता.माळशिरस) येथील श्री विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली *"जयोत्सव २०२४"* वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ व शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचे अमृत महोत्सवी वाढदिवसनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन विद्यालयातर्फे करण्यात आले होतं.



         या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची गीते सादर केली.सदर कार्यक्रमातच 'का थांबला उंबऱ्याशी 'या लावणीने प्रेक्षक व प्रमुख पाहुणे जयसिंह मोहिते पाटील यांची मने जिंकली.सदरची लावणी सादर केल्यानंतर प्रमुख पाहुणे जयसिंह मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रुपये ११,५००/- चे रोख पारितोषिक देऊन सर्वच कलाकारांचे कौतुक केले व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयसिंह मोहिते पाटील यांचा विद्यालयाच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सभापती चंद्रसेन मिसाळ यांनी सत्कार करून प्रमुख पाहुणे जयसिंह मोहिते पाटील यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

          या सत्कारास उत्तर देताना प्रमुख पाहुणे जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की,श्री विजयसिंह मोहिते विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता अतिशय चांगली असून क्रीडा क्षेत्रातील विद्यालयाचे अतिशय उल्लेखनीय काम आहे संस्था वेळोवेळी राबवत असलेल्या विविध उपक्रमात नेहमीच हे विद्यालय प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरत आहे अशा या शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोलीस इथून पुढच्या काळात सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

        सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सभापती चंद्रसेन मिसाळ,सर्व सदस्य,मुख्याध्यापक दिलीपकुमार मोहिते व त्यांचे सर्व कर्मचारी वृंद त्यांनी अथक परिश्रम घेतले.

            सदर कार्यक्रमास पं.स. माजी सदस्य सूर्यकांत शेंडगे,मराठा सेवा संघांचे केंद्रीय सदस्य उत्तमराव माने,कारखाना संचालक सतीश शेंडगे,भगवान मिसाळ,कालिदास मिसाळ,मोहन शेंडगे,सरपंच छायादेवी पाटोळे,माजी सरपंच वृषाली माने,उप सरपंच पंडित मिसाळ, प्रशाला समितीचे सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा