अकलूज प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी.
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अधिवेशन नुकतेच परभणीच्या बी.रघुनाथ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संपन्न झाले.यामध्ये ॲड.अशोक सोनी यांच्या वतीने तत्वज्ञान विषयात चांगली सेवा बजावलेल्या अथवा बजावणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांना त्यांचे वडील धनश्यामदास मोतीलाल सोनी यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुनीलदत्त गवरे यांनी दिली.
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद गेली ४० वर्षापासून महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर कार्यरत आहे.तत्त्वज्ञान प्रेमी, अभ्यासक,तत्त्वचिंतक,प्राध्यापक व विद्यार्थी परिषदेच्या विविध उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.या परिषदेच्यावतीने प्रत्येक वर्षी आयोजित होणाऱ्या अधिवेशनामध्ये दोन परिसंवाद,व्यक्तिगत निबंध वाचन,विद्यार्थी निबंध व वक्तृत्व स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.आजपर्यंतच्या अधिवेशनामध्ये परिषदेच्या वतीने प्राचार्य शिवाजीराव भोसले आदर्श शिक्षक पुरस्कार व डॉ. सूर्यकांत घुगरे उत्कृष्ठ ग्रंथ पुरस्कार' हे पुरस्कार दिले जातात.या पुढील वर्षापासून महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या अधिवेशनात श्री घनश्यामदास मोतीलाल सोनी' जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा