अकलूज प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी.
माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर येथील सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य श्रीराम मंदिरात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ११० व्या पुण्यतिथी निमित्त श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिर येथे नामसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच बरोबर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.२ जानेवारी ते ६ जानेवारी या कालावधीत हे कार्यक्रम होणार आहेत.
या महोत्सवात पहाटे ५ते ६ श्री महाराजांची काकड आरती, सकाळी ६ ते ७:३० श्री महाराजांच्या पादुकास रूद्राभिषेक संपन्न होणार आहे.या नंतर श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा अखंड जप चालणार आहे.दररोज दुपारी २ ते ४ विविध भजनी मंडळाची सुश्राव्य भजन सेवा होणार असून सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीराम रक्षा, श्रीराम ह्रदयं व रामपाठ याचे सामुदायिक पठण होणार आहे.सायंकाळी ७ ते ९ वेळेमध्ये दररोज नामांकित किर्तनकारांची व प्रवचनकारांची सेवा होणार आहे.यात दि.२ जानेवारीला ह.भ.प.श्री.प्रथमेश कुलकर्णी शंकरनगर यांचे नारदीय किर्तन होणार आहे.दि.३ जानेवारीला ह.भ.प.मोहनानंद महाराज महामंत्री आंतरराष्ट्रीय संत आखाडा हनुमान कुटी,उत्तर प्रदेश यांची प्रवचन सेवा होणार आहे.दि.४ जानेवारीला ह.भ.प.सौ.गायत्रीदेवी जामदार याचे नारदीय किर्तन होणार आहे.दि.५ जानेवारीला भक्ती गीत कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य भक्ती वंदना यांचा कार्यक्रम,दि.६ जानेवारीला पहाटे ३:४५ ते ५:०० या वेळेत श्री ना रूद्राभिषेक यजमान सौ.व श्री.आनंद उमराव शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. ५:०० ते ५:३० या वेळेत डॉ.मुग्धाताई तांबे यांचे श्री महाराजांचे निर्वाणाचे प्रवचन होणार आहे.पहाटे ५:५० वाजता गुलाल व पुष्पवृष्टी होणार असून त्यानंतर आरती होईल.सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत ह.भ.प. सुरेशजी सुळ महाराज ज्ञानाई गुरूकुल संग्रामनगर यांचे श्री महाराजांचे चरित्रावर प्रवचन होणार आहे.दुपारी १२:०० वाजता श्री ना महानैवेद्य व आरती झाले नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
तरी सर्व भक्तगणांनी श्री सद्गुरू सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरू ब्रम्हचैतन्य श्रीराम मंदिर संग्रामनगर विश्वस्त मंडळाने केली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा