नातेपूते----प्रतिनिधी
श्रीकांत बावीस्कर
टाइम्स 46 न्युज मराठी.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' उपक्रमातील मुख्यमंत्र्याच्या पत्राचे वाचन. 'मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा 'या उपक्रमातील मुख्यमंत्र्यांचे शुभेच्छा पत्राचे वाचन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्चेवाडी पिंपरी येथील विद्यार्थी शिक्षक यांच्यासह पालकांनी वाचन केले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शाळांना दिलेले शुभेच्छा पत्रातील विषयासंबंधी विद्यार्थ्यांसाठी शासन राबवत असलेल्या विविध उपक्रमांची योजनांची माहिती तसेच माजी विद्यार्थी ,पालक यांचा शाळेतील वाढता सहभाग इत्यादी विषयांचे सविस्तर मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अकबर शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती कर्चेवाडी, पिंपरी मधील पालक ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा