लक्ष्मीकांत कुरुडकर
अकलूज(प्रतिनिधी)
टाईम्स45न्यूज मराठी.
नातेपुते, येथील चंद्रप्रभू इंग्लिश मिडीयम स्कूलचे "अभिमान २०२४" वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून संस्कृती राम सातपुते उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी स्नेहसंमेलनाच्या भव्यदिव्य व डिजीटल नियोजनाचे आणि आयोजनाचे कौतुक करून चंद्रप्रभूचे स्नेहसंमेलन म्हणजे नातेपुतेसह पंचक्रोशीसाठी मनोरंजनाची पर्वणीच असल्याचे म्हटले. पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण, गुणवत्तापूर्ण आणि अद्यावत विकास करणारी चंद्रप्रभू एकमेव स्कूल असल्याचे संस्कृती सातपुते म्हणाल्या.
यावेळी संस्थेचे चेअरमन नरेंद्र गांधी यांनी आध्यक्षिय भाषण करताना पुढील वर्षापासून वैज्ञानिक तंत्रज्ञानासह रोबोटिक आणि विविध कौशल्य विकसित करणारे प्रशिक्षण चंद्रप्रभू स्कूल सूरू करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्याचबरोबर विद्यार्थीयांच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च प्रशिक्षित शिक्षकवर्ग व अद्यावत सुविधांनी परिपूर्ण निसर्ग रम्य स्कूल कॅम्पस असून त्यामुळे उज्वल निकाल, विविध उपक्रम आणि गुणवत्तापुर्ण शिक्षणाची यशस्वी परंपरा २१ वर्षापासून चंद्रप्रभू स्कूलने जोपासली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, म्हणून अभिमान २०२४ सोहळा मोठ्या जल्लोषात आम्ही साजरा करत असल्याचे त्यांनी विषद केले.
सदर कार्यक्रमावेळी प्रशालेचा वार्षिक आढावा मुख्याध्यापिका शितल ढोपे यांनी प्रस्तावनेतून दिला.
यावेळी चंद्रप्रभू दिगंबर जैन ट्रस्टचे अध्यक्ष राजमहेंद्र दोशी , पंचायत समिती सदस्य ज्ञानराज पाटील,बांधकाम सभापती अतुलबापू पाटील, व्ह्यईस चेअरमन डॉ. वर्धमान दोषी, सेक्रेटरी विरेंद्र दावडा, ट्रेझरर संजय गांधी, संस्थेचे संचालक बाहुबली चांकेश्वरा,डॉ. सागर गांधी, महावीर मेहता, मनीष दोशी , श्री.डूडू सह सर्व मान्यवर सपत्नीक उपस्थित होते.
यावेळी विविध भाषातील गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार कलाविष्कार सादर करून श्रोत्यांना तीन तास मंत्रमुग्ध केले. यावेळी विविध नृत्याबरोबर ऐतिहासिक नाटक, सामाजिक संदेश देणारा मूकपट, चांद्रयान वैज्ञानिक संकल्पना सादरीकरण, देशभक्तीपर गीते, महाराष्ट्रीयन लावणी बरोबर विनोदी ,राजस्थानी, गुजराथी, पंजाबी आणि दक्षिण भारतीय गीतांची बहारदार व खमंगदार सांस्कृतिक मनोरंजनाची मेजवानी चंद्रप्रभूने आयोजीत केली आहे अशी कौतुकपर चर्चा उपस्थित श्रोत्यामध्ये होती.
यावेळी मान्यवर पाहुण्याच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्क्रीनवर शाळेचे उपक्रम, सहली तसेच चालू शैक्षणिक वर्षाचा आढावा पालकांना व्हिडिओ चित्रफित मधून दिला. अतिशय भव्यदिव्य,डिजीटल कलामंचावर चंद्रप्रभू स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा लाईव्ह स्क्रीनवर पार पडला. यावेळी आकर्षक रोषणाई ने स्कूल कॅम्पस उजळून निघाला होता. सदर कार्यक्रमास हजारो पालक, नागरिक, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका शितल ढोपे , सांस्कृतिक विभागप्रमुख संजय वलेकर सह सर्व शिक्षक स्टाफ, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी खूप अतोनात परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा