Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

*विकासाची दृष्टी असणारे समाज पुरुष --"सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील*"..

 


*श्रीपूर--बी.टी.शिवशरण*

           प्रतिकुल परिस्थितीचे भान ठेवून विकासाची दृष्टी असणारे समाजपुरुष म्हणून ज्यांनी माळशिरस तालुक्यात सहकार चळवळीला गतीमान करून सहकार रुजवला व औद्योगिक विकासाच्या माध्यमातून विकासाचा आलेख उंचावला ते समाजपुरुष सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करावे हा प्रांजळ हेतू आहे माळशिरस तालुक्यातील तत्कालीन सामाजिक भौगोलिक परिस्थिती पाहिली तर कायमच दुष्काळी परिस्थिती ओसाड उजाड माळरान रस्ते नाहीत पाणी नाही शिक्षणाचा गंध नाही अशा दुर्लक्षित उपेक्षित वंचित प्रवाहात जिणे जगणारे घटकांना त्यावेळी स्वप्नातही वाटलं नसेल की आपल्याला या अडचणीतून बाहेर काढून प्रगती भरभराट संपन्नता व आधुनिक जिवन जगण्यासाठी सुखाचे दिवस येतील पण हा चमत्कार करून दाखवला विकासाची चौफेर दृष्टी असणारे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी अल्पशिक्षित असणारे पण पराकोटीची ध्येय संकल्पना भविष्याचा अचूक वेध घेऊन त्यांनी जे माळशिरस तालुक्यात सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक कृषी क्षेत्रात जे काम केले आहे त्याची तुलना केली तर आजही आश्चर्याचा धक्का बसतो आज सहकार चळवळीत शासनाच्या माध्यमातून अनेकजण संस्था उद्योग उभ्या करण्याचे प्रयत्न करतात पण त्या चालवणे व टिकवणे किती कष्टप्रद गोष्ट आहे हे कळते बहुतांश त्या मोडकळीस तर येतात अन्यथा कायमच्या बंद तरी पडतात आज सर्व पातळ्यांवर सहज सोप्या पद्धतीने कामं करणं सोपं झाले आहे मात्र सत्तर वर्षांपूर्वी जे वातावरण परिस्थिती अडचणी लक्षात घेतल्या तर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी केलेल्या चौफेर कार्याची महती योग्यता लक्षात येते सामाजिक राजकीय वैचारिक परिवर्तनवादी चौफेर विकासाचा विचार व महत्व त्यांनी अधोरेखित करुन त्यांनी प्रत्येकाला सक्षम करण्यासाठी पुरक व्यवसाय धंदे निर्माण केले आर्थिक सधनता सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक परिपक्वता आणण्यासाठी शैक्षणिक महत्व ओळखून त्यांनी शिक्षण संस्था काढली त्याचा आज वटवृक्ष झाल्याचे पहायला मिळतो केवळ माळशिरस तालुक्यातील त्यांनी केलेल्या कार्याची ओळख राहिली नाही तर सहकार चळवळी तून ज्या ज्या क्षेत्रात लक्ष घातले त्याचे सोने केले त्यांचे कार्य म्हणजे परिस स्पर्श होते खेडी समृद्ध परिपूर्ण स्वावलंबी बनविण्याचा उद्देश व हेतु त्यांनी आपल्या कार्यातून करुन दाखवला त्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाची उंची मोठी आहे माळशिरस तालुक्यातील वैचारिक सांस्कृतिक औद्योगिक विकासाची परंपरा पुढे चालवली जात आहे त्यांचे जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा