Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

विरोधकाचे बिनबुडाचे, चुकीचे आणि बालिश आरोप;-- मी दिलेला निर्णय -शाश्वत व योग्यच---" राहुल नार्वेकर "यांची प्रतिक्रिया

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

             मुंबई - 11 जानेवारी :* शिवसेना कुणाची आणि आमदार पात्र-अपात्र याबाबत बुधवार (10 जानेवारी)रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला. यामध्ये मुख्य शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. तसंच, 16 आमदारांपैकी ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवण्यात आलं नाही. दरम्यान, या निर्णयावर आता ठाकरे गटासह विरोधक विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर जोरदार टीका करत आहेत. त्याला नार्वेकरांनी उत्तर दिलंय.

हा निर्णय देताना एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या गटाला खूश करणं किंवा नाराज करणं हा हेतू माझ्यासमोर नव्हता. हा निर्णय कायदेशीर तरतुदी आणि संविधानानुसारच दिला आहे. तसंच, सर्वोच्च न्यायालयानं जे निर्देश दिले होते त्याचे तंतोतंत पालन करून आणि न्यायालयाच्या निकषनुसारच हा निकाल दिलेला आहे. या निकालामुळे सामान्य माणसाला संविधान, न्यायव्यवस्था यावरील विश्वास कायम राहील याचीही मी खबरदारी घेतली आहे. त्यामुळे हा निर्णय हा अतिशय शाश्वत आहे अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

पुढे बोलताना नार्वेकर म्हणाले की, मी दोन्ही गटांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. जर हा निर्णय नियमबाह्य आहे असं, जर वाटत असेल तर ठाकरे गट निर्णयाविरोधात कोर्टात जाऊ शकतो, तो त्यांना अधिकार आहे. परंतु, याचा अर्थ मी दिलेला निर्णय चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही. निर्णयात काय त्रुटी राहिल्यात हे त्यांना दाखवावे लागेल, व ते यामध्ये त्यांना शक्य होणार नाही.


              *साभार*

         *कोकण न्यूज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा