*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
मुंबई - 11 जानेवारी :* सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय दिला. हा निर्णय देताना शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचाही निर्वाळा दिला. या निकालाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.
'देशातील लोकशाही यांनी पायदळी तुडवलीच आहे. आता सर्वोच्च न्यायालय हीच शेवटची आशा आहे. तिथं आणि जनतेच्या दरबारात आम्ही शेवटपर्यंत लढत राहू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 'शिवसेनेच्या याचिकेवर निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं लवाद म्हणून बसवलेले नार्वेकर यांची वागणूक आम्ही पाहत होतो. न्यायमूर्तीच आरोपी जाऊन भेटल्यामुळं निकाल अपेक्षित होता. त्यांचं संगनमत झालंय हेच दर्शवणारी नार्वेकरांची वागणूक होती. लोकशाहीचा खून करण्यासाठी ह्याचं कटकारस्थान सुरू आहे का ही शंका मी उपस्थित केली होती. ती खरी ठरली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नार्वेकरांनी स्वत:चा रस्ता मोकळा करून घेतला!
उद्धव ठाकरे यांनी यावेळी राहुल नार्वेकर यांच्या राजकीय प्रवासाची आठवण देत त्यांच्यावर बोचरी टीका केली. 'राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना लोकशाहीची हत्या केली आहे. नार्वेकर यांनी पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करणं अपेक्षित होतं, मात्र ते करण्याऐवजी पक्षांतरासाठी राजमार्ग आखून दिला. स्वत: त्यांनी अनेक पक्ष बदललेत त्यामुळं त्यांच्या भावी वाटचालीसाठी मार्ग मोकळा करून घेतल्याचं दिसतंय, असा टोला ठाकरे यांनी हाणला
*साभार*
*कोकण न्युज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा