*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
शाळेतील 4 मुलांना सिगरेट ओढताना पाहिल्यावर माझा झालेला उद्वेग धक्कादायक होता. याबाबतीत "उपाययोजना" व कारणमीमांसा करण्याचा हा एक छोटासा "प्रयत्न" !
सुजाण पालकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी सदर "लेख" पुरेसा ठरावा !
मुलगा "व्यसनी" झाल्यावर कालांतराने पश्चाताप करण्याऐवजी, मुलगा "पौंगडावस्था" मध्ये असतानाच "पालकांनी" काही गोष्टींचे "पालन" केल्यास, खबरदारी घेतल्यास तो मुलगा कधीच व्यसनी होणार नाही.
ज्याप्रमाणे कुंभार माठ बनवताना ओल्या मातीला अप्रतिम आकार देतो आणि सर्वोत्कृष्ठ "अविष्कार" सादर करतो ,त्याप्रमाणे लहान मुलांना या आव्हानात्मक "21 व्या शतकात" आपण निश्चितच व्यसनमुक्त बनवू शकतो .
14 ते 21 असे केवळ 7 वर्ष आपल्या मुलावर "लक्ष" दिल्यास मुलगा वाया जात नाही, व त्याला कोणतेच व्यसन लागत नाही . फक्त त्याच्या आईवडिलांनी काळजीपूर्वक या उपाययोजना करायला हव्यात !
षा14 ते 21 वर्षाच्या मुलांबद्दल घ्यावयाची "काळजी" !
आपला मुलगा *शाळेत कधी जातो ,कधी परत येतो हें पालकांना महित असते का ?? समजा सकाळी 7 ते 12 ही शाळेची वेळ असेल तर मुलगा किती वाजता घरी येतो ??? हे पालकांना माहित असायला हवे . आपल्या मुलाचे मित्र कोण याची माहिती पालकांना असायला हवी. समजा शाळा 12 वाजता सुटत असेल आणि मुलगा 2 वाजता घरी येत असेल तर 2 तास कुठे होतास ??? हा प्रश्न प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला विचारायला हवा. त्या 2 तासात कोणते गुण "उधळले" याची माहिती पालकांनी त्याच्याकडून घ्यायला हवी .
शाळेत "Extra तास" असतील तर संबंधित शिक्षकांना "फोन" करून त्याची खातरजमा करून घ्यायलाच हवी .पण असे आज होते का ???
मुलाचे "मित्र" कोण आहेत ???
आपल्या "लाडक्या" मुलाचे मित्र कोण आहेत याची माहिती पालकांना असते का ??? समजा आपल्या मुलाचे खास 4 मित्र असतील तर त्याचे मित्र अभ्यासात हुशार आहेत का ?? अभ्यासात हुशार नसलेल्या ,उनाडक्या करणाऱ्या मित्रांच्या सोबतीस तर आपला मुलगा नाही ना .?? याचीही माहिती पालकांनी करून घ्यावी. संगत कशी आहे , त्यावरून मुलाची "प्रगती" होत असते . त्या मित्रांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का ?? याची माहिती ही पालकांना असायला हवी .कारण मोबाईल चा जितका "फायदा" आहे ,तितकाच नको त्या "वयात" तो बघितल्यावर त्याचा "तोटा" ही आहे . आपल्या मुलाच्या मित्रांना सिगरेट अथवा कोणती "वाईट" सवय आहे का ?? याची ही माहिती पालकांना असायला हवी .
पालकांना मित्राच्या "आई - वडिलांची" माहिती आवर्जून असावी
मित्रांचे आईवडील ?? हो ...! कारण आपल्यामुलाच्या मित्राचे आई वडील जर नोकरी करत असतील आणि सकाळी जॉबला गेल्यावर रात्री येत असतील तर तो मुलगा स्वछंदी होतो. अप्रत्यक्ष "दिल का राजा" असतो . मनाला येईल असे तो करत असतो .कारण त्याला अडवायला , विचारायला कोणीच नसते . दुपारी शाळा सुटल्यावर घरी न जाता , आईस्क्रीम च्या दुकानात शाळेची बॅग ठेवून बाहेर वाईट मुलांच्या बरोबर हिंडून दुपारी 3 वाजता घरी जाऊन पुन्हा 4 वाजता मित्रांच्या संगतीत असणाऱ्या मुलाच्या "सानिध्यात" तुमचा मुलगा असेल तर वाईट संगतीचा परिणाम तुमच्या मुलावर 100% होणारच . त्यामुळे आपल्या मुलाचे मित्र कोण ,त्याचे आईवडील कोण ?? याची माहिती पालकांनी आवर्जून घ्यावी . (प्रत्येक नोकरीधारक व त्यांचे सुपुत्र "व्यसनी" असतीलच असे नाही, हे लक्षात घ्यावे .)
ज्या मित्राचे आई वडील शिस्तप्रिय आणि निर्व्यसनी असतील तेथे तुमच्या मुलाचा "बिघडण्याचा" धोका 50% कमी होतो .
तुमची मुले सिगरेट - वाईन व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेली आहेत का ???
शाळेच्या आवारात भले ही "पानपट्टी" नसेल पण सिगरेट,व्हिडिओ गेम्स चा "विळखा" ( पैसे देऊन खेळण्याचे व्हिडिओ पार्लर ) लहान मुलांवर ओघाने पडत आहे. व्हाईट पावडर , व्हाईट्नर , गांजा आणि वाईन च्या "आहारी" आपला मुलगा आहे याची "खातरजमा" पालकांनी कधी केली आहे का .??
मुलाने गांजा ओढला किंवा नशा केली,वाईन पिली तर वडील मारतील म्हणून आई मुलाला "वाचवत" असते ,त्याची "पाठराखण" करत असते .याचा गैरफायदा मुलगा घेतो . आणि भविष्यात या मुलाला कोणीही सावरु शकत नाही .
आई वडिलांनी निदान आपल्या मुलांबाबत ही खबरदारी घ्यावी .अन्यथा पश्चाताप करण्यावाचून गत्यंतर नाही .
इकबाल बाबासाहेब मुल्ला
( पत्रकार)
संपादक - सांगली वेध ,
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली .
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा