संपादक ----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
अखेर प्रेमचंद बजरंग मुंडे यांचा लढा यशस्वी झाला असून उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला आहे की पवारवाडी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांच्यासह काही सदस्य अपात्र झाल्याने ग्रामसेवक यांना गाव पातळीवर दैनंदिन कामकाज करण्यासाठी सतत अडचणी येत असल्यामुळे त्यांनी दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी रिक्षा पदाचा अहवाल सादर केल्याने त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सतत अडचणी येत असल्यामुळे पवारवाडी ग्रामपंचायतला प्रशासक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ढाकणे यांची नियुक्ती केल्याचे पत्र सादर केले
१) ग्रामसेवक ग्रामपंचायत पवारवाडी यांनी मादर केलेला रिक्त पदाचा अहवाल दिनांक १७/११ /२०२३
२) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधिल कलम ३५(३) मधिल तरतुद
३) मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) जि. प. धाराशिव यांचे पत्र जा कतिपया/सावि २/प्राप-१/कावि-२७४/ दिनांक १९/.१२/.२०२३
याबाबत सविस्तर दिलेले आदेश बाबत माहिती पुढील प्रमाणे
संदर्भ क्रमाक 1 नुसार ग्राम पंचायत पवारवाडी तालुका जिल्हा धाराशिव येथील सरपंच चंद्रकांत विनायक मुंडे तसेच उपसरपंच विश्वनाथ कानीफनाथ मिटकरी यांनी सन २०२० मध्ये झालेल्या ग्रामपंचायततीच्या सार्वत्रिक निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब तहसिलदार उस्मानावाद यांचे मुदतीत व विहीत पध्दतीने सादर केला नसल्यामुळे त्यांना आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरीता ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास (अपात्र) ठरिवण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी उस्मानावाद यांनी विषयांकीत प्रकरणामध्ये दिनांक १७./०७./२०२३ रोजी दिलेल्या आदेशाचे पान सद्यस्थिती ग्रामपंचायत पवारवाडी येथील सरपंच व उपसरपंच हे दोन्ही पद रिक्त झालेली आहेत, तसा रिक्त पदाचा अहवाल ग्रामसेवक पवारवाडी यांनी दिनांक १७./११./२०२३ रोजी सादर केलेला आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३५ (३) तरतुदीनुसार सरपंच व उपसरपंच यांची अधिकारपदे एकाच वेळी रिक्त होतील त्या बाबतीत सरपंचाची निवडणूक होईपर्यंत व जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी किंवा तो या बाबत प्राधिकृत करील असा अन्य अधिकारी सरपंचाच्या सर्व अधिकारांचा वापर करील व त्याची सर्व कार्य व कर्तव्य पार पाडील, मात्र त्याला पंचायतीच्या कोणत्याही सभेत मतदानाचा असणार नाही असे नमूद आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत ग्रामपंचायत पवारवाडी येथिल सरपंच व उपसरपंच यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजात भाग घेता येणार नाही.
त्याअनुषंगाने या आदेशा व्दारे ग्रामपंचायत पवारवाडी येथिल सरपंच किंवा उपसरपंच निवड होई पर्यंत पवारवाडी येथिल ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधिल (३८) नमूद सर्व
अधिकारांचा वापर करुन कामकाज करणेसाठी संदर्भ क्रमांक व ०३ मधिल तरतुदी नुसार गटविकास
अधिकारी धाराशिव प्राप्त अधिकाराचा वापर करुन आपली नियुक्ती करीत आहेत परंतु आपणास सभेत मत
देण्याचा अधिकार नसेल. तसेच सरपंच किवा उपसरपंच यांची निवड होताच हे आदेश संपुष्टात येतील याची नोंद घ्यावी
प्रति,
श्री ढाकणे एस.एस, विस्तार अधिकारी (पंचायत), प्रस्तुत कार्यालय
प्रत माहितीस्तवः-
१) मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जि.प. धाराशिव यांना माहितीस्तव सविनय सादर. २) तहसीलदार धाराशिव यांना माहितीस्तव.
३) ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय पवारवाडी यांना माहिती व योग्य त्या कार्यवाहीस्तव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा