Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

माळशिरस तालुक्यातील अवैध धंद्यांना कोणाचा आशीर्वाद? मोहित गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य विशेष पोलीस महानिरीक्षक "सुहास वारके "यांची भेट..

 


टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

               माळशिरस तालुक्यात 4 पोलीस स्टेशन आणि 1 पोलीस उपविभागीय अधिकारी असून सुद्धा तालुक्यात मटका ,जुगार, केमिकल ची विषारी ताडी,हातभट्टी दारू व बेकायदेशीर अकलूज पुणे प्रवासी वाहतूक असे अवैध धंदे जोमात चालू असून चारीही पोलीस स्टेशन च्या हद्दीत हे असले अवैध धंदे राजकीय पुढाऱ्यांच्या व शासकीय अधिकारी यांच्या अदृश्य हाताशिवाय चालू शकत नाही असे दबक्या आवाजात बोलले जाते.

   महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मोहित गायकवाड यांनी अकलूज पोलिस स्टेशन पासून ते महाराष्ट्राच्या गृह विभागापर्यंत वेळोवेळी तक्रार करून सुद्धा अवैध धंदे याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. तालुक्यातील काही पोलिस स्टेशन मद्ये तक्रारी अर्ज तक्रारदाराच्या संमती शिवाय निकाली काढले जाते. तालुक्यात इंजिीअरिंग कॉलेज, आर्ट, कॉमर्स ,सायन्स कॉलेज ,नर्सिंग कॉलेज MBA कॉलेज आहे 




महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील विद्यार्थी माळशिरस तालुक्यात शिक्षण घेत आहेत केमिकलची विषारी ताडी व मावा गुटख्यामुळे बरेच विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच दारू ,मटका, जुगार यामुळे बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे तसेच बेकायदेशीर वाहतुकीमुळे अपघातात प्रवाशांना जीवाला मुकावे लागले आहे याला जबाबदार अवैध धंदे चालक व राजकीय शासकीय अदृश्य हात असा सवाल सर्व साधारण जनते समोर उभा राहिला आहे अवैध धंदे चालक मालक व समाजकंटक यांना तडीपार करण्याएवजी सर्व साधारण समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना व कॉलेज मधे विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील प्राध्यापकाला तडीपार केले जाते ही फार शोकांतिका आहे म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस मोहित गायकवाड यांनी दिनांक 3/1/2024 रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य मा श्री सुहास वारके यांची भेट घेऊन त्यांच्या समोर माळशिरस तालुक्यातील अवैध धंदे विषयी सविस्तर गाऱ्हाणी मांडली असल्याचे त्यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा