उपासंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील गणेशगांव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्ट गणेशगाव यांच्या वतीने शाळेची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळा गणेशगांव ( ३ ) आंगणवाडी (१) व मोरे वस्ती शाळा (१) असे शाळेला एकूण ५ लॅपटॉप वाटप करण्यात आले.
गणेशगांवमध्ये स्वयंभू गणेशाचे जागृत दैवत आहे मागील १५ वर्षांपासून गणेश जयंतीनिमित्त श्री शंभू महादेव ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून गणेश जयंती साजरी केली जाते . सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे गरजू व गोरगरीब लोकांना २०० रगाचे वाटप करण्यात आले आहे.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष शरद महादेव मोरे,उपाध्यक्ष दत्ताजी गोरे (माळीनगर)सचिव दशरथ महादेव मोरे,सदस्य दत्तात्रय रेडे पाटील (महळूंग),सागर मोरे, केशव सोलनकर,वीरेंद्र पांढरे (नातेपुते),डॉ.संभाजी बनसोडे (नातेपुते), पोपट रुपनवर हे ट्रस्टीज आहेत यनी वेगवेगळ्या उपक्रमातून गरजूची गरज ओळखून मदत कार्य चालू केले आहे . या प्रसंगी गणेशगावचे पोलिस पाटील भाईसाब शेख व ग्राम्स्थ उपस्थित होते. गणेशगांव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हमीद कोरबू उपाध्यक्ष प्रियंका यादव यांनी श्री शंभु महादेव चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा