Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४

जनशक्ती शेतकरी संघटनेच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी-- "अहमद अन्सारी"

 


संपादक ----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448.

              सोलापूर येथे (दि.१६) रोजी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी अहमद अन्सारी यांची निवड शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल ( भाऊ ) खूपसे पाटील यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.


अहमद अन्सारी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काक्रंबा अल्पसंख्यांक विभागप्रमुख या पदावर कार्यरत होते.त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षाला राम राम करून जनशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केल्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे.


जनशक्ती संघटना तुळजापूर तालुक्यामध्ये मजबुतीकरण करण्याचे काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहे असे अहमद अन्सारी यांनी माध्यमाला सांगितले.


पश्चिम महाराष्ट्रामध्ये जनशक्ती संघटनेने पाया मजबुत केल्यानंतर आता मराठवाड्याच्या दिशेने आपले संघटनेचे काम करत असलेले पाहायला मिळत आहे.येणाऱ्या लोकसभा व विधानसभा मध्ये जनशक्ती संघटना निवडणूक मध्ये उतरणार का याकडे सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

.

या नियुक्ती सोहळ्याच्या कार्यक्रमास वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक जुबेर शेख,जनशक्ती संघटनेचे सोलापूर शहराध्यक्ष सिकंदर नदाफ,पत्रकार सिद्दीक पटेल,राम थोरात तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा