अकलूज ----प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
सध्या जग अतिशय झपाट्याने बदलत असून जगामध्ये माणसाचा वेग सर्वात जास्त वाढला आहे.वाहन हे आज जरी काळाची गरज झाली असले तरी सुद्धा माणसाच्या अकाली मृत्यूचे कारणही बेभानपणे वाहन चालवणे होऊ शकते.त्यामुळे गतिमान युगात माणसाने सुरक्षित व सुरक्षेचे नियम पाळून ड्रायव्हिंग करणे गरजेचे आहे.असे आव्हान अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.त्या अकलूज येथे आयोजित केलेल्या वाहतूक सुरक्षा सप्ताह अभिमान उद् घाटन प्रसंगी बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की,आपण वाहन सुरक्षित चालवले तर आपण स्वतः बरोबर इतरांच्या जीवनाची ही सुरक्षेचे हमी देऊ शकतो.वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित ड्रायव्हिंग केल्यास आपण आपली गती कायम ठेवून इच्छित ठिकाणी सुरक्षित आणि वेळेवर पोहोचू शकतो त्यामुळे ड्रायव्हिंग करताना वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट,हेल्मेट व तत्सम सुरक्षा कवच काळजीपूर्वक वापरले पाहिजे.त्याचबरोबर मद्यपान करून वाहन चालवू नये.या सर्व गोष्टीचे धडे सर्वसामान्य जनतेला देत सुरक्षित प्रवासाचे महत्व आपण सर्व अधिकार्यांनी जनतेला समजावून सांगितले पाहिजे.
उपप्रादेशिक कार्यालय अकलूज येथे सदरच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी अकलूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी व अकलूज परिवहन कार्यालयातील सर्व मोटार परिवहन अधिकारी व कर्मचारी वर्ग त्याचबरोबर अकलूज व परिसरातील वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
रस्ता सुरक्षा अभियानची उदघटन कार्यक्रम दि.१६ जानेवारी रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज येथे पार पडले.हे अभियान दि.१६ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबिण्यात येणार असून यामध्ये विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम शाळा,महाविद्यालय या ठिकाणी तसेच अवजड व बस वाहन आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर,हेल्मेट व सीट बेल्ट विषयी जनजागृती व विशेष तपासणी मोहीम,रॅली इत्यादी कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक रमेश सातपुते,सचिन झडबुके,वैभव राऊत,सहायक मोटार वाहन निरीक्षक साळुंखे, कुडपणे,शिंदे मॅडम,कार्यालयीन स्टाफ,मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
चौकट
*सुरक्षित ड्रायव्हिंग वेगावर मात तरच आयुष्याची मिळेल साथ-संभाजी गावडे मोटार परिवहन निरीक्षक.
*यावेळी मोटर परिवहन निरीक्षक संभाजी गावडे यांनी वेगवेगळ्या स्लोगनच्या माध्यमातून ड्रायव्हर व नागरिकांना सुरक्षित व नियम पाळून केलेल्या ड्रायव्हिंगचे महत्त्व पटवून देत त्याचबरोबर मोटरसायकल चालवताना सुरक्षित आणि वेगावर मात करून त्याचबरोबर हेल्मेटचा वापर करून चालवणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले संभाजी गावडे यांच्या स्लोगनच्या माध्यमातून सुरक्षित ड्रायव्हिंग वेगावर मात..तरच आयुष्याची मिळेल साथ...चालकांना वाहन चालकांना नियंत्रित वेग वाहतुकीचे नियम व सुरक्षेची काळजी याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा