अकलुज प्रतिनिधी
केदार -लोहकरे
टाइम्स45 न्युज मराठी
माळशिरस तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांचे वतीने तालुक्यातील विविध कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांना मराठा सेवा संघाची सन २०२४ ची शिवधर्म दिनदर्शिका देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी माळशिरस तालुक्याची प्रांताधिकारी नामदेव टिळेकर,डीवायएसपी सई भोरे पाटील मॅडम तसेच कार्यकारी अभियंता सुनीता पाटील मॅडम, अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे तालुक्याचे तहसीलदार सुरेश शेजुळ नायब तहसीलदार अमोल कदम तसेच नुकतीच बदली होऊन गेलेले अकलूज पोलीस स्टेशनचे पीआय दिपरतन गायकवाड व नवीन हजर झालेले पीआय भानुदास निंभोरे या सर्वांचा सन्मान मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने करण्यात आला. सदर शिवधर्म दिनदर्शिकेच्या मुख्य पानावर संत तुकाराम व त्यांची पत्नी यांचे फोटो असून प्रत्येक महिन्याच्या पानावर सर्व महामानवाचे शिव विवाहाची माहिती दिले आहे.या दिनदर्शिकेचे सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी कौतुक केले व मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड यांच्या कार्यास सतत सहकार्य करण्याचे आश्वासन सर्व अधिकारी यांनी दिले.
या प्रसंगी मराठा सेवा संघाची केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सदस्य अक्काताई माने,तालुका अध्यक्ष जिल्हा ब्रिगेड तालुका अध्यक्षा मनोरमा लावंड,शारदा चव्हाण, संघटक कल्पना चव्हाण, सुवर्णा क्षीरसागर,आशा सावंत,सुवर्णा गोरवे,सुनिता सर्वगोड,बाळासाहेब पराडे,अजित माने,बबनराव शेंडगे,नवनाथ नागणे,राजेंद्र मिसाळ व जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला उपस्थित होत्या.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा