*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
यंदाच्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये पावसाने बऱ्यापैकी ओढ दिली आहे. यामुळे शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे. शिवाय सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये देखील पाणीसाठा अत्यंत कमी झाला होता. असे असताना देखील वारेमाप पाणी सोडण्याचा नेमका हेतू काय आहे...? हे समजणे इतकी जनता भोळी नसून असेच पाण्याचा अपव्यय झाला तर मार्च एप्रिल मे मध्ये पिण्याच्या पाण्याची देखील अडचण निर्माण होईल. उजनीचे पाणी संपवून त्यामधील वाळू उपसण्याचा शासनाचा आणि अधिकाऱ्यांचा डाव दिसतोय असा संतप्त घणाघात जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी केला असून असे झाले तर जनशक्ती संघटना सोलापूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, उजनी धरण ही सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी आहे. गेल्या दोन वर्षाखाली उजनीतील पाणी पळवण्याचा डाव राजकारणी लोकांनी आखला होता, मात्र उजनी संघर्ष समितीने तो हाणून पाडला. त्यामुळे आज उजनी धरण वाचले आहे. उजनी धरणावर शेतकऱ्यांची मोठी उपजीविका असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या शेतीवर आणि जोडधंद्यावर अवलंबून आहे.
मात्र यंदा पाणी नसल्याने उजनी धरण भरले नाही, असे असताना उजनी धरणातील पाणी या ना त्या कारणासाठी सोडून देण्याची घाई गडबड प्रशासनाकडून कशासाठी केली जात आहे..? वास्तविक पाहता मार्च एप्रिल मेपर्यंत पाणी टिकवून ठेवून कदाचित त्या पुढील महिन्यात देखील पाऊस न झाल्यास ते पाणी पिण्यासाठी वापरणे हा नियम आहे. मात्र सध्या उजनी धरण मायनस मध्ये जाऊन देखील उजनीतून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
त्यामुळे उजनीतील सर्व पाणी संपवून कदाचित वाळू काढण्याचा शासन आणि प्रशासनाचा डाव असून खादी मधील बोके जगण्यासाठी ही केविलवाणी धडपड असल्याची दाट शक्यता आहे.
एकूणच वाळू उपसून खादीतील बोके जगवायचे आणि पाणी उपसून शेतकऱ्यांना देशोधडीला न्यायचं हा खूप मोठा शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची लक्षणे असावीत. त्यामुळे असे काही झाल्यास जनशक्ती संघटना जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरेल असा खणखणीत इशारा त्यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी
रोहन नाईकनवरे अक्षय देवडकर गणेश वायभासे,विठ्ठल मस्के,अतुल राऊत,बिभीषण शिरसाट,शरद एकाड,दिपाली डिरे,पांडू
भोसले,बालाजी तरंगे,औदुंबर सावंत,रेश्मा राऊत,राणा वाघमारे,किशोर शिंदे,रामराजे डोलारे,बंडू शिंदे,उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा